बंगळुरू : फ्रान्सिस फोर्ड कोपोला यांच्या 'द गॉडफादर पार्ट 2' या चित्रपटात सिनेटर पॅट्रीक गेअरी झोपेतून जागा होतो आणि त्याला समोर दिसतं ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं एका महिलेचं शरीर. असाच काहीसा अंगावर शहारे आणणारा प्रकार बंगळुरू शहरात प्रत्यक्षात घडलाय.
या घटनेत एक महिला रात्री आपल्या अगदी जवळच्या मैत्रिणीसोबत झोपी जाते आणि सकाळी जेव्हा तिचे डोळे उघडतात तेव्ही ती मैत्रीण अंथरूणात मृत अवस्थेत आढळते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या मैत्रिणीचा रात्री झोपतच कोणीतर गळा चिरून तिची हत्या केलेली असते. हा एखाद्या थ्रिलर चित्रपटात शोभेल असा भयंकर प्रकार खरंच घडला आहे. झोपेतून जागे झाल्याबरोबर आपल्या सर्वात जवळच्या मैत्रिणीला अशा अवस्थेत बघितल्यावर त्या महिलेला बसलेल्या धक्क्याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो.
त्या महिलेने कधी स्वप्नात देखील कधी अशा भयानक गोष्टीचा विचार केला नसेल, की ज्या मैत्रिणीसोबत आदल्या रात्री तिच्या वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या भांडणाबद्दल आपण चर्चा करत होतो, तीच मैत्रिण दुसऱ्या दिवशी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळेल.