Women Abuse Case : मोठी बातमी! परदेशातून परतताच विमानतळावर 'या' खासदाराला होणार अटक? एसआयटी झाली सतर्क

रेवण्णा यांचा मुलगा प्रज्वल हादेखील घरकामगार महिलेचा छळ केल्याप्रकरणी आरोपी आहे.
Women Abuse Case MP Prajwal Revanna
Women Abuse Case MP Prajwal Revannaesakal
Updated on
Summary

देशभरात खळबळ माजवणाऱ्या हासनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या पेन ड्राइव्हमध्ये उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे.

बंगळूर : महिलेचे अपहरण आणि बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याप्रकरणी धजद आमदार आणि माजी मंत्री एच. डी. रेवण्णा (H. D. Revanna) यांच्या विरोधात खटल्याचा तपासाला गती दिली आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) सोमवारी बंगळूरच्या बसवानगुडी येथील त्यांच्या निवासस्थानाची झडती घेतली. एसआयटीने (SIT) रेवण्णाचे वकील गोपाल यांना रेवण्णाच्या कुटुंबाच्या अनुपस्थितीत जागेच्या पाहणीसाठी बोलावले.

Women Abuse Case MP Prajwal Revanna
SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

दोन दिवसांपूर्वी हासन जिल्ह्यातील होळेनरसिंपूर येथील रेवण्णा यांच्या निवासस्थानी ठिकाणाची पाहणी (स्थळ महजर) झाली होता. दरम्यान, खासदार प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्या परदेशातून परतण्याची प्रतीक्षा करणारी एसआयटी टीम बंगळूर विमानतळावर सतर्क झाली आहे. त्यांचे आगमन होताच विमानतळावरच त्यांना अटक करण्याची शक्यता आहे.

माजी मंत्री रेवण्णा यांच्यावर दोन खटले सुरू आहेत. रेवण्णा यांचा मुलगा प्रज्वल हादेखील घरकामगार महिलेचा छळ केल्याप्रकरणी आरोपी आहे. प्रज्वल रेवण्णा यांच्यावरील अश्‍लील व्हिडिओप्रकरणी तसेच बलात्काराचे आरोप व्हायरल झाल्यानंतर रेवण्णाचा जवळचा मित्र सतीश बाबण्णा याने माझ्या आईला बाईकवरून बोलावून नेले आणि तिला बेकायदेशीर कोठडीत ठेवले, असे म्हैसूर येथील पीडितेच्या मुलाने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Women Abuse Case MP Prajwal Revanna
तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

दरम्यान, रेवण्णा यांचे वकील गोपाळ यांनी आरोप केला की, मला त्यांच्या बसवनगुडीच्या घरात प्रवेश देण्यात आला नाही. स्थळ पाहणीसाठी नोटीस बजावूनही एसआयटीला प्रवेश दिला जात नसल्याची तक्रार त्यांनी केली. एसआयटीने आपल्याला येथे हजर राहण्याची नोटीस दिली, मग मला बाहेर का ठेवले? मी सहकार्य करणार नाही, असे तुम्हाला वाटते का, असा गोपाळ यांनी प्रश्न केला.

बबण्णाला आठ दिवसांची पोलिस कोठडी

महिला अपहरण आणि बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याच्या प्रकरणी धजद नेते एच. डी. रेवण्णाचा जवळचा मित्र सतीश बबण्णा याला ८ दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश शहर न्यायालयाने सोमवारी दिले. प्रज्वल रेवण्णा विरुद्ध लैंगिक अत्याचारप्रकरणी अपहरण प्रकरणात सतीश बबन्ना याला न्यायालयात हजर करणाऱ्या विशेष तपास पथकाने पुढील तपासासाठी पोलिस कोठडी देण्याची विनंती केली.

Women Abuse Case MP Prajwal Revanna
Aditya Thackeray : 'भाजपला संविधान बदलायचंय, डॉ. आंबेडकरांनी दिलेली आरक्षणे काढून घेण्याचा त्यांचा डाव आहे'

पोलिस विमानतळावर सतर्क

दरम्यान, केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षा कर्मचारी प्रज्वलच्या परदेशातून येण्याच्या अपेक्षेने सतर्क आहेत. त्याच्याविरोधात ब्लू कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर पोलिस को-ऑपरेशनद्वारे एखाद्या व्यक्तीची ओळख, स्थान किंवा गुन्ह्याच्या संदर्भात त्याच्या सदस्य राष्ट्रांकडून अतिरिक्त माहिती गोळा करण्यासाठी ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली जाते.

देशभरात खळबळ माजवणाऱ्या हासनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या पेन ड्राइव्हमध्ये उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे. हासनचे वकील, भाजप नेते देवराजेगौडा यांनी पत्रकारांशी बोलताना हा आरोप केला. या प्रकरणामागील सूत्रधार दुसरा कोणी नसून शिवकुमारच आहेत, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.