Shakti Yojana : महिलांना मोफत बसप्रवासासाठी मूळ ओळखपत्राची गरज नाही; 'परिवहन'चा मोठा निर्णय

राज्य सरकारच्या (Congress Government) ‘शक्ती’ योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांसाठी मोफत बसप्रवास रविवारी सुरू केला.
Free Bus Travel Shakti Yojana
Free Bus Travel Shakti Yojanaesakal
Updated on
Summary

तुम्हाला मूळ ओळखपत्र हवे किंवा फोटोकॉपी (झेरॉक्स) पुरेशी आहे? हा सर्व गोंधळ आता संपुष्टात आले आहे.

बंगळूर : राज्य सरकारच्या (Congress Government) ‘शक्ती’ योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांसाठी मोफत बसप्रवास रविवारी सुरू केला आणि त्यांना मोफत प्रवासासाठी (Free Bus Travel) ओळखपत्र दाखवावे लागेल, असे सांगण्यात आले. पण मूळ ओळखपत्र दाखवायचे की झेरॉक्स असा संभ्रम होता.

Free Bus Travel Shakti Yojana
Koregaon : मस्तीचा बैल चालत नसतो, त्याला वेसण..; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा कोणाला इशारा?

त्यामुळे राज्याच्या अनेक भागात ओळखपत्राच्या मुद्द्यावरून वाहक आणि महिला प्रवाशांमध्ये वाद झाला. काही ठिकाणी मारामारीही झाली. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या परिवहन विभागाने सोमवारी प्रत दाखवून बसमधून मोफत प्रवास करता येणार असल्याचे स्पष्ट केले.

Free Bus Travel Shakti Yojana
Dhangar Reservation : धनगर आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीसांनी घेतलाय महत्त्वपूर्ण निर्णय; आमदार गोरेंची माहिती

तुम्हाला मूळ ओळखपत्र हवे किंवा फोटोकॉपी (झेरॉक्स) पुरेशी आहे? हा सर्व गोंधळ आता संपुष्टात आले आहे. ओळखपत्राबाबत परिवहन विभागाने आज एक दुरुस्ती आदेश जारी केला असून आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्राची झेरॉक्स प्रत असली तरी प्रवासाला परवानगी आहे. तसेच तुमच्याकडे हार्ड आणि सॉफ्ट कॉपी असली तरीही तुम्ही मोफत प्रवास करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.