नवी दिल्ली : महिला आरक्षण विधेयक आजच लोकसभेत सादर होणार आहे. यानंतर यावर चर्चा होणार असून पुढे ते राज्यसभेतही पाठवलं जाणार आहे. एएनआयनं सुत्रांच्या हवाल्यानं याबाबत माहिती दिली आहे. त्याचबरोबर याबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. (Womens Reservation Bill will be introduced in Lok Sabha today by Law Minister Arjun Ram Meghwal)
कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल हे आज लोकसभेत महिला आरक्षण विधेयक सादर करणार आहेत. पण या विधेयकावर उद्या (२० सप्टेंबर) चर्चा सखोल चर्चा होणार आहे. या चर्चेमध्ये सत्ताधारी पक्ष विधेयकाचा मसुदा सादर करेल त्यानंतर त्यावर सत्ताधारी खासदार आणि विरोधक आपली मत मांडतील. (Latest Marathi News)
त्यानंतर परवा (२१ सप्टेंबर) हे विधेयक राज्यसभेत सादर होईल, या ठिकाणी देखील विधेयकावर सविस्तर चर्चा होणार आहे. चर्चेनंतर जर विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर झालं तर ते पुढे राष्ट्रपतींकडं सहीसाठी पाठवण्यात येईल. राष्ट्रपतींनी सही केल्यानंतर या विधेयकाचं कायद्यात रुपांतर होईल. (Marathi Tajya Batmya)
महिला आरक्षणावरुन मोदी सरकार मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत असल्याचंही बोललं जात आहे. आजतकनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, या विधेयकात १८० जागांवर दोन खासदार निवडले जाण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये महिला खासदारासोबत एक दुसरा खासदारही असणार आहे.
म्हणजेच चक्रीय पद्धतीनं महिला आरक्षणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये एक तृतीयांश जागा आणि त्यानंतर दुसऱ्या जागा अशा प्रकारे हा क्रम सुरु राहिल. सुरुवातीला १८० जागांवर दुहेरी सदस्यता असेल यामध्ये एससी, एसटीच्या समुदयांसाठी एक तृतीयांश जागा आरक्षित राहतील. त्यानंतर २०२७ मध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर लोकसभेच्या जागांमध्ये वाढ होईल त्यानंतर आत्तासारखं एका जागी एकच खासदार ही पद्धत लागू होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.