मोदींच्या केदारनाथ भेटीला पुजाऱ्यांचा विरोध

आदी शंकराचार्य यांच्या स्मृतीस्थळाचे अनावरण करण्यासाठी मोदी शुक्रवारी (ता.५) केदारनाथला जाणार आहेत
narendra modi kedarnath
narendra modi kedarnathsakal media
Updated on

डेहराडून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केदारनाथ दौऱ्याला तेथील पुजाऱ्यांनी विरोध केला आहे. त्‍यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी बुधवारी केदारनाथला पोहचले. तेथे त्यांनी पुजारी व पंडा समाजाच्या प्रतिनिधींशी बंद खोलीत बराच वेळ चर्चा केली. याचबरोबर त्यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेतला.

narendra modi kedarnath
वारकऱ्यांसाठी खुषखबर! आरोग्यमंत्री म्हणाले, कार्तिकी वारीला परवानगी

आदी शंकराचार्य यांच्या स्मृतीस्थळाचे अनावरण करण्यासाठी मोदी शुक्रवारी (ता.५) केदारनाथला जाणार आहेत. उत्तराखंड सरकारने देवस्थान मंडळ स्थापन केले आहे. तो निर्णय मागे घ्यावा, अशी पुजारी व पंडा समाजाची मागणी आहे.

narendra modi kedarnath
रेल्वेकडून प्रवाशांना खास गिफ्ट; दिवाळीनिमित्त रुळावरुन धावणार जादा 'ट्रेन'

त्‍यासाठी धामी यांनी एक समिती स्थापन केली असून त्याचा अहवाल आल्यानंतर कार्यवाही करण्याची ग्वाही दिली होती. पण कोणताही निर्णय न झाल्याने पुजाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यालाही विरोध केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.