आमच्या लसींना मान्यता द्या, अन्यथा...भारताचा EU ला थेट इशारा

Covishield Covaxin
Covishield Covaxin esakal
Updated on

भारतान सरकारने युरोपीय समुदायास (European Union) कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या लशींचा हरित पारपत्रयोजनेत (व्हॅक्सीन पासपोर्ट)समावेश करून त्यांना मंजुरी देण्याची अधिकृत विनंती केली आहे. जोपर्यंत भारतीय लशींना व्हॅक्सीन पासपोर्टमध्ये जागा दिली जात नाही, तोपर्यंत युरोपीयन समुदायाच्या डिजिटल कोविड प्रमाणपत्राला मान्यता दिली जाणार नाही, असेही भारताने ठणकावलं आहे. एक जुलैपासून युरोपीय महासंघ (European Union) पासपोर्टचा नवीन नियम (ग्रीन पास) लागू करत आहे. यूरोपच्या व्हॅक्सीन पासपोर्टमध्ये फक्त चार लसींचा समावेश आहे. यामध्ये फायजर, मॉडर्ना, जॉनसन एण्ड जॉनसन आणि एस्ट्राजेनेकाच्या लसीचा समावेश आहे. यामध्ये भारताच्या कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या लसींचा समावेश करावा अशी धमकीवजा विनंती भारताने दिली आहे.

कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचे डोस घेतलेल्यांचा ग्रीन पासमध्ये समावेश केल्यास प्रवासात मुभा मिळू शकते, शिवाय विलगीकरणाचा कालावधीही कमी होतो. भारताने युरोपीन महासंघातील 27 सदस्य राष्ट्रांनी Interchangeable पॉलिसाचा वापर करण्याचा सल्लाही दिला आहे. तसेच कोविन पोर्टलच्या (Cowin portal) माध्यमातून लसीकरण प्रमाणपत्र स्विकार करावे, अशी विनंती भारताने युरोपीन महासंघाला केली आहे.

Covishield Covaxin
काळजी घ्या; कोरोनाची दुसरी लाट अजून कायम; केंद्राची माहिती

दरम्यान, युरोपीय वैद्यक संस्थेकडून कोविशिल्ड या लशीला महिनाभरात मान्यता मिळेल, असा विश्वास पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी व्यक्त केला आहे.

Covishield Covaxin
केंद्र सरकारने बदलला ५० वर्षापूर्वीचा पेन्शनचा नियम

लसीकरणाचे प्रमाणपत्र CoWIN पोर्टलवरून तुम्हाला तुमच्या पासपोर्टशी लिंक करता येणार आहे. लसीकरणाचे प्रमाणपत्र पासपोर्टशी लिंक कसं करायचे?

- पहिल्यांदा CoWIN च्या अधिकृत साईटवर क्लिक करा - www. cowin.gov.in.

- नंतर 'Raise an issue' या ऑप्शनवर क्लिक करा.

- त्यानंतर 'Passport' ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर ज्याचे प्रमाणपत्र जोडायचे आहे त्याचे नाव शोधा.

- त्यानंतर तुमचा पासपोर्ट नंबर टाका.

- त्यानंतर सविस्तर माहिती भरा.

जर पासपोर्ट आणि कोरोना लसीकरण प्रमाणपत्रातील तपशील जुळत नसतील तर तिथे एडीटचाही ऑप्शन देण्यात आला आहे. चला तर जाणून घेऊया तुमची माहिती कशी एडीट करायची.

-www. cowin.gov.in. या लिंकवर जा.

- त्यानंतर 'Raise an issue' या ऑप्शनवर क्लिक करा.

- नंतर 'Correction in certificate' यावर क्लिक करा.

- त्यानंतर तुम्हाला काही बदल करायचे असतील तर ते करा.

- त्यानंतर 'Submit' या ऑप्शनवर क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.