नागपूर : देशात दररोज पेट्रोल-डिझेल (petrol diesel prices) आणि गॅस यांच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. तसेच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही हे पदार्थ हानिकारक आहेत. तसेच या इंधनामुळे प्रदूषण देखील वाढत आहे. त्यामुळे जैविक इंधनांचा (biofuel) पर्याय पुढे आला आहे.
खनिज तेल हे वाहतुकीसाठी फार मोठ्या प्रमाणात वापरले जाते. पण, याचा पुरवठा मर्यादीत आहे. सध्या त्याची अडचण भासत आहे. त्यामुळे सौरऊर्जा, पवनऊर्जा, इथेनॉल, कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती, बायोडिझेलपासून ऊर्जा, समुद्राच्या पाण्यापासून ऊर्जा, असे अनेक पर्याय आपल्यासमोर आहेत. मात्र, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
जैविक इंधन म्हणजे काय?
वनस्पतीजन्य तेलापासून तयार केलेले इंधन म्हणजे जैविक इंधन. आपल्या देशात विचार केल्यास वनएरंड, जोजबा, करंज, एरंडी, कडूनिंब, सिमारोबा आदी झाडांच्या बियांपासून आपण तेल काढू शकतो. मात्र, त्यासाठी मोकळ्या मैदानात किंवा शेतकऱ्यांनी या वनस्पतींची शेती करणे गरजेचे असल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करतात.
देशात इथेनॉलवर चालणार गाड्या -
ब्राझील, अमेरिका, आदी देशांत पेट्रोलियमच्या आयातीला पर्याय म्हणून हे देश ऊस, मका, बीट, आदी शेती उत्पादनांपासून थेट इथेनॉलचे उत्पादन करतात. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या देशात देखील इथेनॉलवर गाड्या चालविण्याची संकल्पना मांडली गेली. पण, आता या प्रक्रियेला वेग आला आहे. नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः पुढाकार घेत फ्लेक्स फ्युएल इंजिनचा वापर करावा असे म्हटले आहे. त्यासाठी इंधन म्हणून इथेनॉलचा वापर करता येईल. अशा वाहनांमध्ये इंधनात 83 टक्के इथेनॉलचा वापर करणे शक्य होईल. फ्लेक्स-फ्यूएल इंजिन असणाऱ्या वाहनांमध्ये वन फ्यूल सिस्टम असते. त्यामुळे इथेनॉलची रासायनिक प्रक्रिया होऊन उर्जा निर्माण होते.
इथेनॉल निर्मिती कशापासून होते?
महाराष्ट्रात ऊसाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न आहे. त्यापासूनच इथेनॉल तयार केले जाते. इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळल्यास कार्बन मोनोऑक्साइडचे कमी होऊ शकते. त्यामुळे इथेनॉल वापराला प्राधान्य दिले जात आहे. इथेनॉलमिश्रित पेट्रोलचा सामान्य लोकांनाही मोठ्या प्रमाणात फायदा होईल. इथेनॉलमध्ये अल्कोहोलचे पटकन बाष्पीभवन होते, ज्यामुळे इंजिन लगेच गरम होत नाही.
जैवइंधनाचे फायदे -
जैव इंधनाचे अनेक फायदे आहेत. वाढत्या महागाईच्या काळात तर खिशाला परवडणारे इंधन म्हणजे जैवइंधन.
हा एक अपारंपरिक स्त्रोत आहे.
जैव इंधन तयार करण्यासाठी कमी खर्च लागतो, असेही तज्ज्ञ सांगतात.
जैव इंधन शंभर टक्के ज्वलनशील आहे.
जैव इंधनामुळे प्रदूषणाचं प्रमाण कमी होईल.
डिझेलला एकमेव पर्याय म्हणजे जैवइंधन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.