UNESCO Survey : भारतातील 'हे' विमानतळ बनले जगातील सर्वात सुंदर विमानतळ; UNESCO कडून जागतिक पुरस्कार जाहीर

दोन लाख ५५ हजार ६६१ चौरस मीटरमध्ये हे टर्मिनल चार खांबांवर उभारले गेले आहे.
Bangalore Airport
Bangalore Airportesakal
Updated on
Summary

ही मान्यता मिळवणारे हे एकमेव भारतीय विमानतळ आहे, असे बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Bangalore Airport) अधिकाऱ्यांनी सांगितले.

बंगळूर : येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Kempegowda International Airport KIA) टर्मिनल-२ (टी २) ने ‘जगातील सर्वात सुंदर विमानतळांपैकी एक’ म्हणून ओळख मिळवली आहे. त्याला युनेस्कोच्या प्रिक्स व्हर्साय द्वारे (UNESCO Prix Versailles) ‘इंटिरिअर २०२३ साठी जागतिक विशेष पुरस्कार’ प्रदान केला आहे.

Bangalore Airport
कोकणात 'अणुऊर्जा, रिफायनरी'ला विरोध असताना माशेलकरांचं महत्त्वाचं भाष्य; म्हणाले, सरकारनं माझ्यावर जबाबदारी टाकली तर..

ही मान्यता मिळवणारे हे एकमेव भारतीय विमानतळ आहे, असे बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Bangalore Airport) अधिकाऱ्यांनी सांगितले. २०१५ मध्ये स्थापित प्रिक्स व्हर्साय संस्थेने नाविन्यपूर्णता, सर्जनशीलता, स्थानिक वारशाचे प्रतिबिंब, पर्यावरणीय कार्यक्षमता आणि सामाजिक परस्परसंवादाची मूल्ये या विमानतळवर जपली आहेत, असे म्हटले आहे.

Bangalore Airport
Konkan Tourism : 'थर्टी फर्स्ट'साठी कोकणातील गुहागरला पर्यटकांची सर्वाधिक पसंती; चौपाटीसह पर्यटनस्थळी मोठी गर्दी

दोन लाख ५५ हजार ६६१ चौरस मीटरमध्ये हे टर्मिनल चार खांबांवर उभारले गेले आहे. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी उद्‍घाटन झालेल्या टर्मिनल- २ चा पहिला टप्पा दरवर्षी २५ दशलक्ष प्रवाशांना सामावून घेण्यासाठी डिझाइन केलेला आहे, असे त्यात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()