World Wind Day 2023 : जर हवाच नसेल तर..? जागतिक वायूदिनी समजून घ्या हवेचे महत्व

या दिवसाचे आयोजन करताना शाश्वत पर्यायी उर्जेचा विचार केला जातो.
World Wind Day 2023
World Wind Day 2023esakal
Updated on

Importance Of Wind : जागतिक वायूदिन प्रत्येक वर्षी 15 जून ला साजरा केला जातो. हा दिवस पवन ऊर्जेचे महत्व समजणे आणि त्याच्या क्षमतेविषयी जागरुकता वाढवण्यासाठी समर्पित आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे सर्व सदस्य देश दरवर्षी हा दिवस साजरा करतात. या दिवसाचे आयोजन करताना शाश्वत पर्यायी उर्जेचा विचार केला जातो. या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये 16 वा जागतिक पवन दिवस 2023 साजरा केला जात आहे.

हवा एक शक्तीशाली नैसर्गिक संसाधन आहे. ज्यातून ऊर्जा निर्मिती होऊ शकते. हे लक्षात घेऊन जागतिक वायू दिनी संयुक्त राष्ट्रसंघांचे सर्व सदस्य देश पवन उर्जेचा उत्सव साजरा करतात. त्यासाठी कार्यक्रम आयोजित करतात.

World Wind Day 2023
Wind power : ‘ड्रायपोर्ट’सोबत सौर ऊर्जा प्रकल्प

जागतिक वायूदिनाचा इतिहास

युरोपियन पवन ऊर्जा संघाने 2007 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा केला होता. काही काळाने ग्लोबल विंड एनर्जी काउंसिलच्या मदतीने हा दिवस संपूर्ण जगभर साजरा केला जाऊ लागला. त्यानंतर 2009 मध्ये या दिवसाला वैश्विक स्तरावर साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. या दिवसाचा हेतू हा स्वच्छ हवेचे महत्व जगाला पटवून देणे हा आहे. शिवाय वातावरणात असलेला भरपूर प्रमाणातला कार्बन याविषयी जागरुकता यानिमित्ताने केली जाते.

World Wind Day 2023
ईसीएतर्फे सायन्सपार्कमध्ये पवन ऊर्जा प्रकल्प

या दिवशी काय केलं जातं?

बरेच लोक या दिवशी किनार्यावरील आणि ऑफशोअर विंड फार्मला देखील भेट देतात.

या दिवशी लोक मोहिमेत सामील होतात, तसेच पवन ऊर्जेसंबंधी सर्व प्रकारची माहिती मिळवतात.

या दिवसानिमित्त अनेक शहरांमध्ये कार्यशाळा आयोजित केल्या जातात, जेणेकरून लोकांना हवेसारख्या शक्तिशाली नैसर्गिक स्त्रोताचे महत्त्व समजावे.

यानिमित्त अनेक शहरांमध्ये पवन परेडचे आयोजनही केले जाते.

भारत आणि पवन ऊर्जा:

  • वाढत्या लोकसंख्येमुळे भारतालाही अक्षय ऊर्जेचे महत्त्व समजले आहे.

  • पवन ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाचा देश आहे,

  • ज्यामध्ये तामिळनाडूचा वाटा सर्वाधिक आहे.

  • भारतातील पवन ऊर्जा प्रकल्पांची एकूण स्थापित क्षमता 40 GW च्या जवळपास आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.