Wrestlers Protest: फक्त ब्रिजभुषणच नव्हे इतरही अनेकजण...; फिजोथेरपिस्टच्या नव्या आरोपांनी खळबळ

कुस्तीपटूंचे फिजिओथेरपिस्ट परमजीत मलिक यांनी ब्रिजभुषण सिंहंवर नवे आरोप केले आहेत.
Brij Bhushan Sharan Singh Wrestler Protest
Brij Bhushan Sharan Singh Wrestler Protestesakal
Updated on

Wrestlers Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे उत्तर प्रदेशातील खासदार ब्रिजभुषण सिंह यांच्यावर पुन्हा एकदा नवे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कुस्तीपटूंचे फिजिओथेरपिस्ट परमजीत मलिक यांनी हे आरोप केले असून यामध्ये इतरही लोकांचा हात असल्याच्या त्यांच्या दाव्यानं खळबळ उडाली आहे. (Wrestlers Protest Not only Brijbhushan but many others done wrong Physiotherapist Paramjeet Malik new allegations)

Brij Bhushan Sharan Singh Wrestler Protest
Supriya Sule: ...म्हणून सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष बनवलं, शरद पवारांनी सांगितलं कारण

फिजिओथेरपिस्ट परमजीत मलिक यांनी इंडिया टिव्हीसोबत फोनवरुन बोलताना हे गंभीर आरोप केले आहेत. "महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभुषण सिंहांवर केलेले आरोप शंभर टक्के खरे आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. या महिला कुस्तीपटूंची गेल्या अनेक वर्षांपासून शोषण होत आहे. ब्रिजभुषण या महिला कुस्तीपटूंना लखनऊ आणि दिल्लीतील आपल्या बंगल्यावर बोलवत होते. जे खेळाडू यासाठी नकार देत त्यांना मॅच खेळण्यापासून रोखलं जात होतं" (Latest Marathi News)

Brij Bhushan Sharan Singh Wrestler Protest
Colombia Plane Crash: अ‍ॅमेझनॉच्या घनदाट जंगलात कोसळलेल्या विमानातील मुलं ४० दिवसांनी सापडली; वाचा थरारक अनुभव

अनेकांचा आवाज दाबण्यात आला

"ब्रिजभुषण सिंहांवरील आरोप तर शंभर टक्के खरे आहेत. उलट आरोपी तर इतरही अनेक लोक आहेत. पण बदनामीमुळं या मुली पुढे येत नाहीत. सुमारे १०० मुली अशा असतील ज्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रुपात शोषण झालं आहे. जसं की त्यांचं मानसिक स्वरुपात आणि शाररिक स्वरुपात शोषण करण्यात आलं आहे.

मी एकटाच असा नाही जो कुस्तीशी जोडला गेलेलो आहे. जितके कोच आहेत, रेफरी आहेत. तसेच जे मॅनेजमेंटमध्ये खेळाडू राहिले आहेत. सर्वजणांना या गोष्टी माहिती आहेत. लोकांनी काही प्रमाणात आवाजही उठवला होता. पण त्यांचा आवाज दाबण्यात आला आहे," असा आरोपही मलिक यांनी केला आहे. (Marathi Tajya Batmya)

Brij Bhushan Sharan Singh Wrestler Protest
BJP Reaction on NCP: सुप्रिया सुळेंच्या कार्याध्यक्षपदी निवडीनंतर भाजपनं अजित पवारांना डिवचलं!

मला ब्रिजभुषण सिंहांनी रातोरात हटवलं

दरम्यान, जेव्हा छोट्या मोठ्या ट्रायल टुर्नामेंट होत असतं तेव्हा ब्रिजभुषण सिंह मुलींच्या जवळ यायचे त्यानंतर कोणाच्या गालाला हात लाव, गळ्यात हात टाकणं, कोणाच्या पाठीवरुन हात फिरवणं, पाठ थोपटणं या गोष्टी त्यांच्यासाठी सामान्य होत्या.

कँपमध्ये ब्रिजभुषण यांचे सर्व चेलेचपाटे बरोबर ठेवायचे. रेफरी तर कधीतरी टुर्नामेंटसाठी यायचे. मुलींनी माझ्याकडं देखील याबाबत तक्रारी केल्या होत्या. २००६ मध्ये मी पत्रकार परिषद घेतली होती, त्यानंतर मला तिथून रातोरात काढून टाकण्यात आलं, अशा शब्दांत फिजिओथेरपिस्ट परमजीत मलिक यांनी नवे आरोप केल आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.