नवी दिल्लीः कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीवर पैलवान आंदोलक ठाम आहेत. आता आंदोलक पैलवान हे त्यांनी कमावलेलं मेडल गंगेमध्ये विसर्जित करणार आहेत. शिवाय उद्यापासून आंदोलनाची वेगळी दिशा असणार आहे.
दिल्लीतल्या जंतरमंतरवर २३ एप्रिलपासून पैलवानांचं धरणं आंदोलन सुरु आहे. खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी आंदोलकांची आहे. मात्र परवा संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावेळी आंदोलकांवर पोलिसांनी कारवाई केली आणि पोलिसी बळावर आंदोलन संपवलं.
आज आंदोलकांनी एक भूमिका जाहीर केली असून देशासाठी मिळवलेले मेडल ते गंगेमध्ये विसर्जित करणार आहेत. केंद्र सरकाराचा निषेध म्हणून आणि ब्रिजभूषण यांच्यावर कारवाईसाठी दबाव निर्माण करण्यासाठी पैलवान हे पाऊल उचलत आहेत.
हरिद्वार येथे आज संध्याकाळी ६ वाजता मेडल गंगेमध्ये विसर्जित करण्यात येणार आहे. विघ्नेश फोगाट यांनी ही माहिती दिली. तसेच उद्यापासून इंडिया गेटवर आंदोलक पैलवान उपोषणाला बसणार आहेत.
जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलंनाविरोधात रविवारी पोलिसांनी कडक कारवाई केली. दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरहून नवीन संसद भवनाकडे कूच करणाऱ्या कुस्तीपटूंना ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवरील कुस्तीपटूंचा तंबूही हटवला. आंदोलकांवर एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम १४७, १४९, १८६, १८८, ३३२, ३५३, पीडीपीपी कायद्याच्या कलम ३ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.