राज्यातील मॉन्सूनला ‘यास’चा फटका नाही

‘आयएमडी’चे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, यास वादळ आज (ता. २६) ओडिशा किनारपट्टीला धडकणार आहे.
Yaas Cyclone
Yaas CycloneSakal
Updated on

नवी दिल्ली - बंगालच्या उपसागरात (Bengal Sea) निर्माण झालेल्या ‘यास’ या चक्रीवादळामुळे (Yaas Cyclone) पश्चिम किनारपट्टीवर प्रतिकूल परिणाम (Effect) जाणविणार नाही व मॉन्सूनच्या (Monsoon) प्रगतीतही त्यामुळे बाधा येण्याची शक्यता नाही, असा दिलासा भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिला आहे. (Yaas Cyclone No Effect on Monsoon)

Yaas Journey
Yaas JourneySakal

‘आयएमडी’चे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, यास वादळ आज (ता. २६) ओडिशा किनारपट्टीला धडकणार आहे. यामुळे ओडिशा, बंगालपासून झारखंडपर्यंत वेगवान वारे व मुसळधार पाऊस सुरू आहे. ओडिशाच्या किनारपट्टीच्या भागांत ‘यास’च्या प्रभावामुळे ताशी १६० किमी वेगाने वारे वाहतील. मात्र या वादळाचा पश्चिम किनारपट्टीवर याचा प्रतिकूल प्रभाव पडण्याची शक्यता नाही. केरळमध्ये मॉन्सून ठरलेल्या वेळेत (१ जून) दाखल होईल. त्यानंतर आठवडाभरात मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होतो. यादृष्टीने त्याचा सध्याचा प्रवास सुरू आहे. ‘यास’चा प्रभाव ओसरल्यावर पूर्व किनारपट्टीवरही मॉन्सून सक्रिय होईल असेही महापात्रा यांनी स्पष्ट केले.

Yaas Cyclone
IPS सुबोध कुमार जयस्वाल CBI च्या प्रमुखपदी

अंदमान बेटांवर शुक्रवारी (ता. २१) दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वेगाने पुढे सरकत मॉन्सूनने संपूर्ण अंदमान, निकोबार बेटसमूह व्यापला असून, श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावरही मॉन्सून दाखल झाला आहे. त्याच वेळी बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होऊन ‘यास’ चक्रीवादळ तयार झाले. हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकत असल्याने मॉन्सूनचे प्रवाहही सक्रिय झाले आहेत. मंगळवारी (ता.२५) मॉन्सूनने अरबी समुद्रातील मालदीव कोमोरीन भागासह, बंगालच्या उपसागराच्या काही भागांतही प्रगती केल्याचे हवामान विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.

पश्‍चिम बंगाल, ओडिशाला इशारा

‘यास’ चक्रीवादळ उत्तरेकडे सरकताना अधिक तीव्र होणार असून, आज (ता. २६) ओडिशा, पश्‍चिम बंगाल, बांगलादेशच्या किनाऱ्याजवळ जमिनीवर येण्याचे संकेत आहेत. त्यानंतर ते बिहारच्या दिशेने हळूहळू सरकून त्याचा प्रवाह कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांत जोरदार वारे वाहून मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडत असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.