फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला टेरर फंडिंग प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले आहे. गेल्या आठवड्यात त्याने गुन्ह्याची कबुली दिली होती आता यासिन मलिकचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट करत आहेत. फोटोमध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यासीन मलिकसोबत हस्तांदोलन करताना दिसत आहेत. अशा लोकांना तुरूंगात पाठवण्याऐवजी काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांचे स्वागत करण्यात आले, असा आरोपही सोशल मीडियावर लोक करत आहेत.
खरं काय आहे?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो 17 फेब्रुवारी 2006 चा आहे. काश्मीरबाबत फुटीरतावादी नेते, इतर नेते आणि काश्मीरमधील संघटनांशी गोलमेज चर्चा करण्यापूर्वी त्यांनी JKLF अध्यक्ष यासिन मलिक यांची भेट घेतली होती. हा फोटो Getty Images वर उपलब्ध असून हा फोटो एएफपी या वृत्तसंस्थेने दिला आहे.
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी यासीन मलिक यांना पंतप्रधान निवासस्थानी बोलावले होते. या भेटीदरम्यान मनमोहन सिंग यांची यासिन मलिक यांच्याशी भेट झाली होती. पंतप्रधान निवासस्थानातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 2019 मध्ये मोदी सरकारने यासिन मलिकच्या JKLF संघटनेवर बंदी घातली. 2017 मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. यासीनसह इतर अनेक फुटीरतावादी नेत्यांवरही टेरर फंडिंग प्रकरणी कारवाई करण्यात आली होती. सध्या तो तिहार तुरुंगात आहे.
आरोप काय आहेत..
25 जानेवारी 1990 रोजी हवाई दलाच्या श्रीनगरच्या बाहेरील भागात हवाई दलाच्या जवानांवर दहशतवादी हल्ला झाला होता. यासीन मलिकचेही नाव या हल्ल्यात समोर आले. यासीन मलिकवर खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचेही न्यायालयाने म्हटले होते. हे प्रकरण अजूनही न्यायालयात आहे. प्रत्यक्षात हवाई दलाचे जवान विमानतळावर जाण्यासाठी बसची वाट पाहत होते, तेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात चार जवान शहीद झाले तर किमान 40 जखमी झाले होते
सोशल मीडियावर लोक या फोटोबाबत वेगवेगळ्या गोष्टी लिहित आहेत. मोनिका वर्मा नावाच्या युजरने लिहिले की, या माणसाला तुरुंगात पाठवण्याऐवजी त्याचे स्वागत झाले. त्याच्यावर सुरक्षा दलाच्या जवानांची हत्या केल्याचा आरोप आहे. आज न्याय झाला असून तो दोषी ठरला आहे. शेफाली वैद्य यांनी लिहिले, यासीनने कबूल केले की तो दहशतवादी आणि खुनी आहे. शहजाद जय हिंद नावाच्या युजरने लिहिले, यूपीए सरकारमध्ये गेस्ट ऑफ ऑनर का दिले जात होते?
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.