जागतिक महामारी ठरलेल्या कोरोनातून २०२२ मध्ये कुठेतरी उसंत मिळाली होती. पण दोन वर्षे घरात गेल्यामुळे अनेकांच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम झाले. यामध्ये अनेकांचे धंदे बुडाले, नोकऱ्या गेल्या तर अनेकांचे आयुष्यच बदलून गेले. या सगळ्यानंतर २०२२ साल कुठेतरी दिलासा देणारं ठरलं. त्यामध्ये बंद पडलेले उद्योगधंदे हळूहळू पुर्वपदावर आले तर परत नोकऱ्या सुरू झाल्या.
या वर्षात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. त्यामध्ये गल्लीपासून ते दिल्ली पर्यंतच्या घटनांचा सामावेश आहे. तर अनेक घटनांनी आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम केले. अनेक गाणे, चित्रपट, सरकारी निर्णय, राजकारण, दिग्गजांचे मृत्यू तर अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा सामावेश आहे. तर या वर्षी सर्वांत गाजलेले मुद्दे कोणते आहेत ते आपण यामध्ये पाहणार आहोत.
हेही वाचा - जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'
मोदींचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला
शेतकरी कायदे लागू केल्यामुळे आधीच शेतकरी वर्गात मोदी सरकार विरोधात असंतोष होता. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे सरकारने तो निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला पण त्यानंतर पंजाबच्या शेतकऱ्यांनी पंतप्रधानांचा ताफा फिरोजपूरमध्ये अडवला होता. ही घटना ५ जानेवारी रोजी घडली होती. या प्रकारामुळे मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ लागले होते.
लता मंगेशकर यांचे निधन
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने जगविख्यात असलेला स्वर देशाने कायमचा गमावला होता.
कर्नाटक हिजाब प्रकरण
कर्नाटक येथे एक महाविद्यालयीन विद्यार्थीनी हिजाब घालून महाविद्यालयात गेल्यानंतर जय श्रीरामच्या घोषणा काही विद्यार्थ्यांकडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर या वादाला तोंड फुटले होते. हे प्रकरण कर्नाटक हायकोर्टात गेले होते. त्यानंतर महाविद्यालयात हिजाबबंदीचा आदेश कोर्टाने दिला होता.
पाच राज्यातील विधानसभा निवडणुका
पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यातीव विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया फेब्रुवारी ते मार्चदरम्यान पार पडली. त्यामध्ये मणिपूर, गोवा, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपची सत्ता आली तर पंजाबमध्ये आपची सत्ता आली होती. तर या निवडणुकांत काँग्रेसचा सुफडा साफ झाला होता. या विजयासह आपने दुसऱ्या राज्यात आपली सत्ता स्थापन केली होती. १० मार्च रोजी या पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल लागले होते.
काश्मीर फाईल्स चित्रपट
११ मार्च रोजी बहुचर्चित आणि वादात सापडलेला काश्मीर फाईल्स हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने भारतीय राजकारण आणि समाजकारणावर बराच परिणाम केला. तर यामुळे अनेक राजकीय वादही देशात पाहायला मिळाले.
पहिली खासगी रेल्वे धावली
तामिळनाडू येथील कोईम्बतूर ते शिर्डी या मार्गावर देशातील पहिली खासगी रेल्वे धावली. १४ जून रोजी साऊथ स्टार रेल या खासगी कंपनीने आपली पहिली रेल्वे चालवली आहे. तर देशातील रेल्वेच्या खासगीकरणाची ही पहिली पावती होती.
अग्निपथ योजना
केंद्र सरकारने तरूणांना सैन्यात काम करण्यासाठी ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत सैन्यात चार वर्षांसाठी देशसेवा करता येणार आहे. चार वर्षांसाठी काम, सेवा करणाऱ्या या सैनिकांना 'अग्निवीर' म्हटलं जाईल. चार वर्षांनंतर या अग्निवीरांना निवृत्त केले जाईल. मात्र, यातील 25 टक्के तरुणांना पुन्हा सेवेत घेतले जाईल अशी ही योजना आहे.
राज्यातील सत्तांतर
२० जून रोजी विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठे बंड केले. आपल्यासोबत ४० आमदारांना घेऊन ते गुवाहटीला गेले. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत जाऊन नवीन सरकार स्थापन केलं. तर भाजपसोबत झालेली युती तोडून तयार झालेले महाविकास आघाडी सरकार फक्त अडीच वर्ष टिकू शकले. या जवळपास १५ दिवसांच्या काळात महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. त्यानतंर नव्याने स्थापन झालेल्या सरकारने विधीमंडळात आपले बहुमत सिद्ध केले.
उमेश कोल्हे हत्या प्रकरण
भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केल्यामुळे महाराष्ट्रातील अमरावती येथील उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचे पडसाद देशभर पसरले होते. २१ जून रोजी ही हत्या झाली होती.
निरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले
भारताचा भालाफेकपटू निरज चोप्रा याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. ३० जून रोजी नीरज ने ही कामगिरी केली आहे. त्याच्या पदकामुळे भारताची मान उंचावली आहे.
द्रौपदी मुर्मू देशाच्या राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांनी २५ जुलै रोजी देशाच्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. तर ११ ऑगस्ट रोजी जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. विजयी झालेले दोघेही एनडीएचे उमेदवार होते. राष्ट्रपती पदासाठी यशवंत सिन्हा हे यूपीएचे उमेदवार होते.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला सुरूवात झाली. ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून ही यात्रा सुरू झाली. तर ही यात्रा काश्मीरमध्ये जाऊन संपणार आहे.
नामेबीयामधून चित्यांचे भारतात आगमन
भारतातून नामशेष झालेला प्राणी परत भारतात आणला गेला आहे. १६ सप्टेंबर रोजी नामेबिया या देशामधून चित्ते भारतात आणले गेले. त्यामुळे भारतातून नामशेष झालेला प्राणी परत भारतात आला.
देशभरात PFI वर छापे
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेवर राष्ट्रीय तपास संस्थने छापे टाकले. दहशतवादाशी संबंध असल्याच्या कारणावरून या संस्थेशी निगडीत असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. तर या संस्थेवर पाच वर्षाची बंदी घालण्यात आली आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड
देशात काँग्रेस पक्षाचा पाया डगमगला असताना अनेक कार्यकर्त्यांकडून पक्षाच्या अध्यक्षांची मागणी केली होती. त्यानंतर पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकाध्ये शशी थरूर यांचा पराभव झाला आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचा विजय झाला. त्यामुळे आता काँग्रेस पक्षाला नवी दिशा मिळेल का याकडे लक्ष लागले आहे. १९ ऑक्टोबर रोजी खर्गे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
श्रद्धा वालकर हत्या प्रकरण अफताब
श्रद्धा वालकर या महाराष्ट्रातील तरूणीची अफताब या तरूणाने दिल्लीत केल्याने खळबळ उडाली होती. हा प्रकार १४ नोव्हेंबर रोजी उघडकीस आला होता. त्याने मे महिन्यातंच श्रद्धाची हत्या करून ३५ तुकडे केल्याचं समोर आलं होतं. या प्रकरण देशात खूर गाजलं आहे.
गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर
पंतप्रधान मोदींचे होमग्राऊंड असलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभांचे निकाल ८ डिसेंबर रोजी जाहीर झाले. हिमाचलमध्ये काँग्रेसने तर गुजरातमध्ये भाजपने सत्ता राखली आहे.
तर असं होतं साल २०२२. अनेक महत्त्वाच्या घटना या साली घडल्या तर अनेक महत्त्वाचे लोकं यावर्षी देशाने गमावले. राजकीय, आर्थिक, सामाजिक अशा सर्व अंगाने विविध घटना देशात घडल्या. पण वर्षाच्या सरत्या वेळेला परत कोरोनाने वर तोंड काढलं आहे. त्यामुळे येत्या नवीन वर्षात पुन्हा एकदा काळजी घ्यावी लागणार आहे. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.