INDIA vs NDA: सगळे भाजप-भाजप करत होते पण 'या' एकाच पठ्ठ्याचे अंदाज ठरले खरे

Yogendra Yadav: यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळपासून सुरूवात झाली असून बहुमत मिळवण्यासाठी भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीए झगडत आहे.
Yogendra Yadav Prediction INDIA vs NDA Loksabha Election 2024 Prediction
Yogendra Yadav Prediction INDIA vs NDA Loksabha Election 2024 PredictionEsakal
Updated on

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळपासून सुरूवात झाली असून बहुमत मिळवण्यासाठी भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीए झगडत आहे.

दरम्यान, 1 जून रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये अनेकांनी भाजप दणदणीत विजय मिळवेल असे अंदाज वर्तवले होते. मात्र प्रत्यक्षात भाजपला बहुमतासाठी झगडावे लागत आहे.

या सर्वांमध्ये राजकीय अभ्यासक योगेंद्र यादव यांनी एकटी भाजप 260 पेक्षा अधिक जागा जिंकणार नाही असे अंदाजवर्तवला होता. आणि योगेंद्र यादव यांचा अंदाज आता खरा होताना दिसत आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार एनडीए 290 तर भाजप अवघ्या 243 जागा जिंकताना दिसत आहे.

Yogendra Yadav Prediction INDIA vs NDA Loksabha Election 2024 Prediction
Rahul Gandhi: मोहब्बत की दुकान! काँग्रेसने सेच्युरी करताच राहुल गांधींची कार्यकर्त्याला मारली मिठी

योगेंद्र यादवांचे भाजपबाबतचे अंदाज

दरम्यान एक्झिट पोल समोर आल्यानंतर सगळ्यांनी भाजप आणि एनडीएला पसंती दिली होती. मात्र, योगेंद्र यादव असे एकमेव होते ज्यांनी सांगितले होते की, भाजप एकट्याच्या जीवावर 260 जागाही जिंकणार नाही. तसेच एनडीएला 300 जागा जिंकणे कठीण होणार आहे. त्यांनी असे म्हटले होते की, भाजप 250 ते 275 पेक्षा कमी जागांवर विजय मिळवले.

आता आज सकाळपासून निकालेचे कौल येत असताना भाजपला जबरदस्त फटका बसताना आणि योगेंद्र यादव यांचा अंदाज खरा होताना दिसत आहे. कारण आतापर्यंत हाती आलेल्या कौलानुसार एकटी भाजप 243 जागांवर तर एनडीए 290 पेक्षा कमी जागांवर पुढे आहे.

Yogendra Yadav Prediction INDIA vs NDA Loksabha Election 2024 Prediction
Varanasi Lok Sabha Election Result 2024 : वाराणसीत मोदींची हॅट्रिक, ...पण मताधिक्य घटलं; विरोधी उमेदवाराच्या मतांमध्ये भरघोस वाढ

योगेंद्र यादवांचे काँग्रेस आणि इंडिया आघाडीबाबत अंदाज

या निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर योगेंद्र यादव यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडी अंदाज वर्तवताना सांगितले होते की, काँग्रेस 85 ते 100 जागा जिंकेल आणि इंडिया आघाडी 205 ते 235 जागा जिंकतील.

दरम्यान आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार काँग्रेस जवळपास 100 जगांवर विजय मिळवता दिसत आहे. तर इंडिया आघाडीही 235 जागांवर जिंकताना दिसत आहे.

या सर्व आकडेवारीवरून स्पष्ट होते की, योगेंद्र यादव यांचे सर्वच अंदाज खरे ठरत आहेत. तर मोठ मोठे एक्झिट पोल तोंडावर पडल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.