किसान मोर्चाने केले निलंबित; योगेंद्र यादव म्हणाले...

लखीमपूर प्रकरणात मृत्यू झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या घरी भेट दिल्याने त्यांना निलंबित करण्यात आलंय.
yogendra yadav
yogendra yadavTeam eSakal
Updated on

संयुक्त किसान मोर्चाने सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांना शेतकरी संघटनेतून एक महिन्यासाठी निलंबित केल्याच्या एक दिवसानंतर योगेंद्र यादव यांनी एक निवेदन जाहीर केले आहे. स्वराज अभियानाचे नेते योगेंद्र यादव यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आपण शेतकऱ्यांच्या या निर्णयाचा आदर करतो आणि तो स्वीकारतो. केंद्रा सरकारने लागू केलेल्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी संघटना आपल्यासाठी सर्वोच्च आहे.

"आपण शेतकरी संघटनेने घेतलेल्या सामूहिक निर्णय प्रक्रियेचा आदर करतो. मला देण्यात आलेली शिक्षा आनंदाने स्वीकारतो. या ऐतिहासिक शेतकरी चळवळीच्या यशासाठी मी पूर्वीपेक्षा अधिक मेहनतीने काम करत राहीन," असे म्हणत यादव यांनी या प्रकरणी माफी मागितली आहे. योगेंद्र यादव यांच्या निलंबनाची मागणी अनेक शेतकरी संघटनांनी केली होती. त्यांनी लखीमपूर हिंसाचारात मारल्या गेलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या शोकग्रस्त कुटुंबांना भेट दिली होती. यावर योगेंद्र यादव यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "लखीमपूर खेरी येथील चार शहीद शेतकरी आणि एका पत्रकाराला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सभेला उपस्थित राहिल्यानंतर, मी त्याच घटनेत मरण पावलेले भाजप कार्यकर्ते शुभम मिश्रा यांच्या घरी गेलो. त्याच्या कुटुंबाप्रती माझी संवेदना व्यक्त केली. तो पुढे म्हणाला.

yogendra yadav
ट्विटर अल्गोरिदमकडून उजव्या विचारसरणीला प्राधान्य : रिपोर्ट

योगेंद्र यादव पूढे म्हणाले की, "आपल्या विरोधकांच्या दुःखात सहभागी होणे ही मानवतेची आणि भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. अशा गोष्टींमूळे चळवळ कमकुवत होत नाही तर बळकट होते असे मला वाटते. चळवळीतील प्रत्येकजण माझ्याशी सहमत असू शकत नाही. मला आशा आहे की या प्रश्नावर सकारात्मक संवाद सुरू होऊ शकेल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.