उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी २४ वर्षीय फातिमा खानला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फातिमाला ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमधून अटक करण्यात आली आहे.
फातिमाच्या मोबाईलवरून योगी यांच्या नावाने धमकीचा मेसेज पाठवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी व्हॉट्सॲपवर मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला एक संदेश पाठवण्यात आला होता, ज्यामध्ये मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.