अतिक अहमद आणि अश्रफ यांच्या हत्येनंतरही त्यांची काळी कृत्ये समोर येत आहेत. अतिकच्या अंधारमय साम्राज्याबाबतचे सत्य हळूहळू बाहेर येत आहे. अतिकने अनेक जीमीवर बेकायदेशीर ताबा मिळवला होता. त्यामुळे आता उत्तर प्रदेशात असे काही घडले आहे की ते यापूर्वी कधीच घडले नसेल.
एकेकाळी गरिबांच्या जमिनींवर माफिया कब्जा करत असत. मात्र आता योगी सरकारने माफियांच्या जमिनीवर गरिबांसाठी घरे बांधली आहेत. संगम नगरी प्रयागराजमध्ये माफिया अतिक अहमदच्या ताब्यातून मोकळ्या झालेल्या जमिनीवर गरिबांसाठी फ्लॅट तयार झाले आहे. आता लवकरच गरिबांना त्यांच्या स्वप्नातील घराच्या चाव्या मिळणार आहेत. यासाठी प्रयागराज विकास प्राधिकरण (PDA) लवकरच तारखा जाहीर करू शकते. (uttar pradesh latest news)
येत्या दोन दिवसांत या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. या घरांना पूर्णपणे भगवा रंग देण्यात आला आहे. सजावटीचे काम वेगाने पूर्ण झाले आहे. लॉटरीद्वारे हे फ्लॅट दिले जाणार आहेत. १७३१ चौरस मीटर जागेवर हे ७६ फ्लॅट तयार आहेत.
साडेतीन लाखांत मिळणार फ्लॅट -
प्रयागराज विकास प्राधिकरणात ६ हजार ६० जणांनी ऑनलाइन अर्ज केले होते. त्यापैकी पात्र ठरलेल्यांची लॉटरी काढण्यात येणार आहे. ७६ जणांना लॉटरीद्वारे घर मिळणार आहे. या ४ मजली इमारतीत पार्किंग, कम्युनिटी हॉल आणि सौर दिवे असतील. लाभार्थ्यांना ६ लाखांना फ्लॅट मिळेल, ज्यामध्ये १.५ लाख भारत सरकारकडून आणि एक लाख राज्य सरकारकडून अनुदान म्हणून दिले जातील. योजनेतील निवड झालेल्या लाभार्थ्यांना साडेतीन लाख रुपये भरावे लागणार आहेत.
अतिकची ११६९ कोटींची मालमत्ता जप्त -
योगी सरकार अतिक अहमदच्या मालमत्तेवर बुलडोझर चालवत आहे. गेल्या २ वर्षात अतिक अहमदची बहुतांश बेकायदेशीर मालमत्ता एकतर जप्त करण्यात आली आहे किंवा त्यावर बुलडोझरचा वापर करण्यात आला आहे. प्रशासनाने काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अतिक अहमद यांची ११६९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.