योगींच्या शपथविधीला संपूर्ण युपीत होणार घंटानाद

शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी केली आहे.
Yogi Adityanath
Yogi AdityanathYogi Adityanath
Updated on

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी केली आहे. शपथविधीच्या दिवशी उत्तर प्रदेशातील प्रत्येक जिल्हा, शहर, तहसील शहर आणि गावातील मंदिरांमध्ये घंटानाद, लोककल्याणासाठी आरती आणि पूजाअर्चादेखील केली जाणार असल्याचेही सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर, शपथविधीसाठी उत्तर प्रदेशातील सर्व मठ आणि मंदिरांतील ऋषी-मुनींना लखनऊला येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच लखनऊला येणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याने वाहनावर झेंडे घेऊन यावे, अशा सूचनाही पक्षाकडून देण्यात आल्या आहेत. (Yogi Adityanath Oath Ceremony)

Yogi Adityanath
चीनमध्ये 133 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले

मंदिरात होणार पूजा-अर्चा

भाजपचे प्रदेश सरचिटणीस गोविंद नारायण शुक्ला यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, लखनऊ येथे होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यातील सर्व जिल्हे, विभाग आणि शक्ति केंद्रातील कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हाध्यक्षांना यादी तयार करून राज्य मुख्यालयाकडे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाजपच्या सूचनेनुसार शपथविधी कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी 8 ते 10 या वेळेत राज्यातील सर्व शक्ती केंद्र स्तरावरील कार्यकर्ते जनकल्याणासाठी प्रार्थना करणार आहेत.

वाहनांवर झेंडे लावून या

शपथविधी सोहळ्याच्या भव्यतेचा अंदाज यावरून लावता येतो की, पक्षाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, उत्तर प्रदेशातील प्रत्येक विभागातील प्रत्येकी दोन कार्यकर्त्यांना एक दिवस आधी म्हणजे 24 मार्च रोजी लखनऊला बोलावण्यात आले आहे. लखनऊला येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी वाहनांवर झेंडे घेऊन यावे, असे निर्देश पक्षाने दिले आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांतील सर्व प्रमुख चौक, बाजारपेठांमध्ये होर्डिंग्ज लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Yogi Adityanath
सत्तेत गेल्यापासून सेनेला तिथीचं विस्मरण : शर्मिला ठाकरे

सर्व वर्गातील लोकांना आमंत्रण

भाजपने जारी केलेल्या सूचनेनुसार शपथविधी सोहळ्यात संपूर्ण राज्यातील मठ आणि मंदिरातील साधू-संतांची यादी तयार करून त्यांना शपथविधीसाठी आणण्यास सांगण्यात आले आहे. या सर्वाची जबाबदारी जिल्हाध्यक्षांपासून मंडल अध्यक्षांवर देण्यात आली आहे. भाजपने केवळ मठ मंदिरांच्या साधू-संतांनाच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील सर्व जिल्ह्यातील प्रमुख वर्गातील लोकांनाही लखनऊमध्ये आमंत्रित केले आहे. ज्यात समाजसेवक, साहित्यिक, व्यावसायिक, डॉक्टर, अभियंता अशा प्रत्येक वर्गातील आणि समाजातील लोकांचा सहभाग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.