Yogi Adityanath: आगामी लोकसभा निवडणुकांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि केशवप्रसाद मौर्य दिल्लीत दाखल होणार असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी गुरुवारी चर्चा होण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या ८० जागा असून यापैकी अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी भाजपची रणनीती आखली जात आहे. गेल्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातून भाजपला ६२ जागा मिळाल्या होत्या. यात मित्रपक्ष असलेल्या अपना दलाच्या दोन जागा जोडल्यास ६४ खासदार गेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकून आले होते.
यावेळी महाराष्ट्र व बिहारमध्ये भाजपची स्थिती समाधानकारक नसल्याने उत्तर प्रदेशात ७५ पेक्षा अधिक जागा भाजपने जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिल्लीत बोलाविण्यात आले आहेत.
यावेळी भाजप व त्यांच्यासोबत असलेल्या मित्रपक्षांच्या रणनीतीवरही चर्चा होणार आहे. सध्या अपना दल, सुहेलदेव भारतीय समाजवादी पक्ष व निषाद पक्षाने भाजपला समर्थन दिले आहे. या पक्षांना किती जागा सोडायच्या यावर प्रामुख्याने चर्चा होणार आहे. भाजपने अधिकाधिक जागा लढवाव्यात यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा होणार आहे.
यासाठी सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे ओमप्रकाश राजभर, समाजवादी पक्षातून भाजपात आलेले दारासिंग चौहान, आकाश सक्सेना यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान देण्याचा विचार केला जात आहे. मित्रपक्षांना राज्यमंत्रिमंडळात स्थान देऊन लोकसभा निवडणुकीत भाजपला अधिक जागा मिळविण्याच्या प्रस्तावावर यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.