Mahakumbh 2025 : योगी आदित्यनाथ यांनी लाँच केला महाकुंभ मेळाव्याचा लोगो, वेबसाईट अन् अ‍ॅप; भाविकांना असा होणार फायदा

Yogi Adityanath unveiling kumbh logo 2025 : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी प्रयागराज महाकुंभ मेळावा २०२५ च्या लोगोचे अनावरण केले.
yogi adityanath unveiling kumbh logo 2025
yogi adityanath unveiling kumbh logo 2025
Updated on

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी प्रयागराज महाकुंभ मेळावा २०२५ च्या लोगोचे अनावरण केले. यासोबतच त्यांनी या सोहळ्याची माहिती देणारी वेबसाईट आणि अॅप देखील लाँच केले. या लोगोमध्ये कुंभ मेळाव्याचे प्रतीक कलश दिसत आहे, ज्यामध्ये ओम लिहिलेले आहे. तर मागच्या बाजूला संगमाचे दृश्य पाहायला मिळत आहे.

दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केशव प्रसाद मौर्य आणि जलशक्ती मंत्री स्वतंत्र देव सिंह यांच्या उपस्थितीत हे अनावरण केले, यावेळी अधिकाऱ्यांसोबत महाकुंभ मेळाव्याच्या तयारीचा आढावा देखील योगी आदित्यनाथ यांनी घेतला.

या अॅप आणि वेबसाईटमध्ये अनेक महत्वाच्या गोष्टी देण्यात आल्या आहेत. महाकुंभ मेळाव्याच्या लोगोचा वापर हा महाकुंब मेळाव्याच्या वेबसाईटसह अॅप आणि इतर अनेक प्रचार माध्यमांमध्ये केला जाणार आहे. वेबसाईटच्या माध्यमातून भाविक आणि पर्यटकांना विमानसेवा, रेल्वेसेवा तसेच रस्ते मार्गाने महाकुंभ मेळाव्यात पोहचण्यासाठीची माहिती दिली जाईल.

yogi adityanath unveiling kumbh logo 2025
E-KYC Online Process: शेतकऱ्यांनो, केवायसी केलीय का? 'या' दोन पिकांसाठी सरकार देतेय पैसे, जाणून घ्या ऑनलाईन प्रोसेस

तसेच याच्या माध्यमातून प्रयागराजमध्ये निवासस्थान, स्थानिक वाहतूक, पार्किंग, घाटांपर्यंत पोहचण्याचा मार्ग इत्यादी माहिती दिली जाणार आहे. यामध्ये स्थानिक आणि जवळपासच्या पर्यटनस्थळांच्या रस्त्यांची माहिती देखील मिळेल. कुंभमेळा परिसरात फिरताना आणि धार्मिक विधींमध्ये सहभागासाठीची सविस्तर माहिती देखील यामध्ये देण्यात येईल.

भाविकांसाठी स्मृती चिन्ह आणि धार्मिक वस्तू विकत घेण्याची सोय, आपतकालिन स्थितीमध्ये एसओएस सुविधा, ज्याच्या मदतीने भाविक तत्काळ मदत मिळवू शकतील, या सोयी देखील यामध्ये देण्यात येत आहेत.

भाविकांना घाट, निवासस्थान आणि महत्वाच्या ठिकाणी सहज पोहचता यावे, यासाठी गुगल नेव्हिगेशन, भाविकांसाठी आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे अलर्ट यासंबंधी माहिती देखील देण्यात आली आहे. या काळात होणाऱ्या सर्व कार्यक्रम आणि इतर महत्वाच्या घटनांचे वेळापत्रक देखील येथे देण्यात आले आहे.

yogi adityanath unveiling kumbh logo 2025
RG Kar Case: ''त्या' ट्रेनी डॉक्टरवर गँगरेप झाला नव्हता'', CBIच्या चार्जशीटमध्ये मोठा खुलासा; धक्कादायक माहिती आली समोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.