लखनऊ- उत्तर प्रदेशातील योगी सरकारने जवळपास अडीच लाख सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात कठोर पाऊल उचललं आहे. 2,44,565 सरकारची कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्यातील वेतन रोखण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना सरकारने वारंवार सूचना दिल्या होत्या की, त्यांनी सम्पदा पोर्टलवर त्यांच्या संपत्तीची माहिती भरावी. मात्र, अद्याप अडीच लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी माहिती भरली नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी योगी सरकारने दिलेला हा मोठा धक्का म्हणावा लागेल. मुख्य सचिव मनोज कुमार सिंह यांनी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत त्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती देण्याचे निर्देश दिले होते. असे असताना काही सरकारी कर्मचाऱ्यांनी सूचनेचे पालन केलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.