Indigo Flight : मुलीने केला बॉयफ्रेंडला मॅसेज, बॉम्बस्फोटाच्या भितीने फ्लाइट सहा तास लेट

'You are Bomber' असा मैत्रिणीने मित्राला गंमतीत केलेल्या मॅसेजमुळे घोळ झाला. सोबतच्या प्रवाशाने क्रू ला केलेल्या तक्रारीमुळे चेकींगसाठी मुंबईला जाणारी फ्लाइट ६ तास लेट झाली.
Indigo Flight
Indigo Flightesakal
Updated on

कर्नीटकमधल्या मंगलूरूमध्ये एक शॉकिंग घटना समोर आली. एका मुलीने बॉयफ्रेंडला केलेल्या मॅसेजमुळे मुंबईला जाणारी Indigo फ्लाइट ६ तास लेट झाली. एवढेच नाही तर फ्लाइटमधून सर्व प्रवाशांना उतरवण्यात आले. नंतर फ्लाइटमध्ये विस्फोटक तर नाही हे तपासण्यासाठी सर्व फ्लाइटचे चेकिंग करण्यात आले.

Indigo Flight
देशांतर्गत विमान प्रवास महागणार?; सरकारच्या 'या' निर्णयाचा होणार परिणाम

काय आहे पूर्ण प्रकरण

घटना रविवार १४ ऑगस्टची आहे. एका प्रवाशाने शेजारी बसलेल्या प्रवाशाच्या चॅटमध्ये संशयास्पद मॅसेज बघितला. तो कोणत्या तरी मुलीशी चॅट करत होता. त्यानंतर शेजारचा माणूस तक्रार करायला क्रू मेंबरकडे पोहचला. मुलगा मंगलुरूवरून मुंबईला जात होता. तर मुलगीला बेंगलुरूला जायचे होते. दोघे मित्र होते आणि सेक्यूरीटी विषयी त्यांच्यात चेष्टामस्करी चालू होती. यावेळी १४ बी सिटवर बसलेल्या माणसाने पाहिले की, सीट १३ ए वर बसलेल्या मुलाच्या फोनवर 'You are Bomber' असा मॅसेज आला. त्या नंतर त्या माणसाने क्रू मेंबर्सला याविषयी माहिती दिली.

Indigo Flight
Paytm travel festival : विमान प्रवासावर मिळवा भरघोस सवलत; फक्त दोन दिवस बाकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन जण व्हॉट्सॲपवर चॅट करत होते. तेव्हा एका व्यक्तीने ते वाचले. त्या नंतर फ्लाइटमध्ये एकच गोंधळ झाला. फ्लाइट टेक ऑफ होऊ दिली नाही. पोलिसांनी याची तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे. त्या मुलाला व त्याच्या मैत्रिणीला तपासासाठी थांबवून घेण्यात आले. त्यांना प्रवास करू दिला नाही. तर सर्व १८५ प्रवाशांच्या सामालाचे चेकिंग करण्यात आले. त्या नंतर संध्याकाळी ५ वाजता विमान मुंबईला निघाले.

Indigo Flight
महिलांनो, भारतात Solo Traveling करायचेय? बिनधास्त फिरा 'या' 5 ठिकाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.