Murder Case : हुबळी पुन्हा हादरली! प्रेमाला नकार देणाऱ्या तरुणीचा घरात घुसून चाकूने भोसकून खून

वीरपूर ओणी येथील अंजली मोहन अंबिगेर (वय २१) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.
Anjali Ambiger Murder Case
Anjali Ambiger Murder Caseesakal
Updated on
Summary

गिरीशचे अंजलीवर प्रेम होते. पण तिने त्याचे प्रेम नाकारले. यामुळे संतापलेल्या गिरीशने काही दिवसांपूर्वी अंजली हिला ‘नेहा हिरेमठ हिच्याप्रमाणे तुलाही मारून टाकीन’, अशी धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे.

बंगळूर : येथील विद्यार्थिनी नेहा हिरेमठ हिच्या खुनाचे (Neha Hiremath Murder) प्रकरण ताजे असतानाच आणखी एका तरुणीचा हुबळी येथे खून झाला आहे. प्रेमाला नकार दिल्याने प्रियकराने काल पहाटे तरुणीच्या घरात घुसून चाकूने भोसकून तिचा खून केल्याची घटना भेंडिगेरी पोलिस ठाण्याच्या (Bendigeri Police Station) कक्षेत घडली.

हुबळी (Hubli) येथील भेंडिगेरी पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या वीरपूर ओणी येथील अंजली मोहन अंबिगेर (वय २१) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. यल्लापूर गल्लीतील गिरीश ऊर्फ ​​विश्वा एस. सावंत हा संशयित आरोपी आहे. अंजलीने प्रेमास नकार दिल्याने गिरीश याने काल पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अंजलीच्या घरी जाऊन तिचा दरवाजा ठोठावला.

Anjali Ambiger Murder Case
Private School : आठ शाळांना बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा E-mail; शहरात भीतीचं वातावरण, पोलिस प्रशासन सतर्क

ओळखीची व्यक्ती आली असावी, असे समजून अंजली दरवाजा उघडण्यासाठी गेली. त्याचबरोबर त्याने तिला घरात ढकलले आणि चाकूने भोसकले. तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तरीही त्याने तिला चाकूने भोसकून तो पसार झाला. तिची आई घरकाम करणारी असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच भेंडिगेरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. गुन्हा दाखल करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला.

Anjali Ambiger Murder Case
Anjali Ambiger Murder Case
Anjali Ambiger Murder Case
सांगली, मिरज Railway Station बॉम्बने उडविण्याची कसाबकडून धमकी; फोनमुळे पोलिस दलात उडाली खळबळ

कोणी दिली होती धमकी?

गिरीशचे अंजलीवर प्रेम होते. पण तिने त्याचे प्रेम नाकारले. यामुळे संतापलेल्या गिरीशने काही दिवसांपूर्वी अंजली हिला ‘नेहा हिरेमठ हिच्याप्रमाणे तुलाही मारून टाकीन’, अशी धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वीही गिरीशने अंजलीला म्हैसूरला येण्याची धमकी दिली होती. ‘तू माझ्यासोबत आली नाहीस, तर नेहा हिरेमठ हिचा कसा खून केला, तसेच करेन, अशी धमकी त्याने दिली होती. त्याच्यावर अनेक चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचाही आरोप आहे. त्याने दुचाकी चोरल्याचेही सांगण्यात येत आहे.

आजीच्या तक्रारीकडे पोलिसांचे दुर्लक्ष

अंजली हिची आजी गंगम्मा यांनी संशयित आरोपी गिरीश हा अंजलीला धमक्या देत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र, आजीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत तिला माघारी पाठविले होते. पण, आज अंजलीचा खून झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.