Young Inspirators Network : ‘यिन’ केंद्रीय समितीच्या शिष्टमंडळाच्या भारत यात्रेस प्रारंभ

साबरमती आश्रमासह अहमदाबादमधील ऐतिहासिक स्थळांचे जाणले महत्त्व
yin
yinsakal
Updated on

पुणे - ‘शोधूया स्वत:ला, समजूया देशाला’ या ब्रीद वाक्याने सकाळ समूहाच्या ‘यिन’ केंद्रीय समितीच्या शिष्टमंडळाने गुजरातमधील साबरमती आश्रमापासून भारत यात्रेस प्रारंभ केला.

‘यिन’ केंद्रीय समितीच्या शिष्टमंडळाने साबरमती आश्रमाला भेट दिली. या शिष्टमंडळाने गुजरातमधील विविध क्षेत्रांतील व्यक्ती व जनतेशी सुद्धा संवाद साधला. गांधीजींचे वास्तव्य असणारे ‘हृदयकुंज’, ‘दांडीपूल’, स्मारक व संग्रहालयाची माहिती घेतली.

गांधीजींनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्यामध्ये ज्या चरख्याला क्रांतीचे साधन मानले त्या चरख्याची संकल्पना ‘यिन’ पदाधिकाऱ्यांनी समजून घेतली. गुजरात विद्यापीठामध्येही मुलांच्या सर्जनशीलतेमध्ये वाढ व्हावी आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून अभ्यासक्रमामध्ये चरख्यापासून सूतकताईचा समावेश केला गेला आहे. टाकाऊ कापसाच्या अवशेषापासून हाताने कागद तयार करणाऱ्या ‘कलमखुश’ कारखान्याला पथकाने भेट दिली. त्यासंदर्भात उत्पादन प्रक्रिया, किंमत, कामगार संख्या, गुणवत्ता आदी बाबींवर विचारविनिमय करण्यात आला. या संस्थेची स्थापना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या हस्ते झाली होती.

या शिष्टमंडळाने अहमदाबादमधील ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. त्यामध्ये भद्रकाल किल्ला, भद्रकाली मंदिर, साई सय्यद मशीद, अष्टपदनीदेरासर महावीर मंदिर, अहमदाबादमधील पहिली महिला सावकार हठीसिनूदेरासर घर, एलिस ब्रिज, काँफ्लेक्टोरिअम यांचा समावेश होता. ब्रिटिशकालापासून आतापर्यंत बदलत आलेली वास्तुकलेचा व नगररचनेचा अभ्यास करण्यात आला. भारत समजून घेण्याच्या प्रक्रियेत ‘यिन’ केंद्रीय समितीच्या शिष्टमंडळाने संबंधित स्थळांना भेट देऊन तेथील राजकीय, सामाजिक, आर्थिक, भौगोलिक, सांस्कृतिक परिस्थितीचा जवळून अभ्यास केला आहे.

yin
Young Actresses Net Worth: कोणती अभिनेत्री आहे सर्वाधिक श्रीमंत?

तरुणांद्वारे व विविध तज्ज्ञांद्वारे त्यावर संशोधन व विचार-विनिमय करून काही प्रकल्प हाती घेऊन ते प्रत्यक्षात उतरविण्याचे काम केले जाणार आहे. भारत हा एक विविधतेने नटलेला देश आहे. अनेक जाती, धर्म, पंथांचे लोक इथे राहतात, त्यांमध्ये एकोपा व आपलेपणा असावा, तरुणांच्या विकासाबरोबरच देशाचा विकास व्हावा या उद्देशाने ‘यिन’ केंद्रीय समितीच्या सदस्यांनी भारत यात्रेला सुरुवात केली आहे.

या वेळी ‘यिन’ केंद्रीय समितीच्या सभापती दिव्या भोसले, रोजगार समितीचे अध्यक्ष नीलेश चव्हाणके, कौशल्य विकास समितीचे अध्यक्ष संजय गिरी, स्त्री प्रतिष्ठा समितीच्या कार्याध्यक्ष श्रद्धा जगताप, रोजगार समितीच्या संघटक अमृता चव्हाणके, शेती समितीचे उपाध्यक्ष ब्रह्मानंद नपते, राजकीय समितीचे संघटक अॅड. बाळासाहेब शिंदे, उद्योजक समितीचे संघटक अॅड. संतोष रैस्वाल या सदस्यांनी भारत यात्रेसाठी पुढाकार घेतला. गुजरात मधील विजय भारतीय, चिंतन गांधी, सनीकुमार बोजो यांचे या गुजरात दौऱ्याप्रसंगी विशेष सहकार्य लाभले.

yin
Young Entrepreneurs: तरुण उद्योजकांनी संशोधनाला प्राधान्य द्यावे.

यिन’च्या केंद्रीय समितीच्या शिष्टमंडळाला भेटून आनंद झाला. या शिष्टमंडळाची विविध विषयाचे पैलू जाणून घेण्यासाठी उत्सुकता कौतुकास्पद होती. मला खात्री आहे की, या यात्रेतून सर्वांना नक्कीच राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा मिळेल.

-विजय भारतीय, समन्वयक, वि. द. युवा, गुजरात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.