नवी दिल्ली: उच्च सुरक्षा असतानाही पुन्हा एकदा संसदेच्या सुरक्षेचा भंग झाला आहे. यावेळी एक व्यक्ती गेट क्रमांक एमईजी उडी मारून आत शिरला. मात्र, तो काही करण्याआधीच सीआयएसएफ जवानाने त्याला पकडले. संसद भवनाच्या MEG3 गेटमधून लोक ये-जा करतात. मात्र आज हे गेट बंद असताना या तरुणाने त्यावर उडी मारून संसदेच्या संकुलात प्रवेश केला. त्यानंतर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.