Viral: खिशात पिस्तुलासारखं लायटर, प्रेयसीला भेटण्याचं कारण, बुरखा घालून तरुणाची एन्ट्री अन्... जे घडलं त्यानं सारेच हादरले

Moradabad News: प्रियकर बुरखा घालून प्रेयसीला भेटायला गेला. मात्र प्रेयसीला भेटण्यापूर्वीच लोकांनी त्या तरुणाला चोर समजून त्याला पकडून बेदम मारहाण केली. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Youth in burkha
Youth in burkhaESakal
Updated on

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यूपीच्या मुरादाबादमध्ये एका व्यक्तीला आपल्या प्रेयसीला भेटण्याचे इतके वेड लागले होते की, तो बुरखा घालून तिच्या परिसरात पोहोचला. तरुणाच्या चालण्यावरून आसपासच्या लोकांना संशय आला. जमावाने तरुणाला बुरखा काढायला लावल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. काही लोकांनी तरूणाला चाइल्ड लिफ्टर समजून बेदम मारहाणही केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तरुणाची चौकशी करत आहेत. तरुणाकडून पिस्तुलाच्या आकाराचे गॅस लायटरही सापडले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.