उत्तर प्रदेशातील अमेठी येथील एका तरुणाने ड्रीम 11 या गेमिंग ॲपवर नुकतेच साडेतीन लाख रुपये जिंकले होते. पण, पैसा हेच तरुणाच्या मृत्यूचे कारण ठरले. तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गुंडांकडून पैशासाठी मुलाचा सतत छळ होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. गावातील गुंडांना पैसे हडप करायचे होते. त्याला मारहाणही करण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.