धक्कादायक! तंबाखू खाण्यावरुन सुवर्ण मंदिराबाहेर राडा, भररस्त्यात एकाची हत्या

तंबाखू खाण्यावरुन कधी काय होईल हे सांगता येत नाही.
Youth was killed near the Suvarn Temple in Punjab
Youth was killed near the Suvarn Temple in Punjabesakal
Updated on
Summary

तंबाखू खाण्यावरुन कधी काय होईल हे सांगता येत नाही.

तंबाखू (Tobacco) खाण्यावरुन कधी काय होईल हे सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार अमृतसरमध्ये घडलाय. अमृतसर (Amritsar) येथील सुवर्ण मंदिराजवळ (Suvarn Mandir Punjab) धक्कादायक घटना घडलीय. मंदिराजवळ तंबाखू खाल्ल्यानं एका व्यक्तीची दोन निहंग शीखांनी हत्या केली. या हत्येमध्ये दोन निहंग शीखांसह एका वेटरचाही समावेश आहे.

तिघांनी हॉटेलच्या बाहेर भररस्त्यात तरुणाची चाकू भोसकून हत्या केल्याने परिसरात खळबळ उडालीय. पंजाबमधील सुवर्ण मंदिरापासून 800 मीटर अंतरावर ही घटना घडलीय. ज्या भागात ही घटना घडली आहे, तिथं दारू पिण्यास किंवा धूम्रपान करण्यास बंदी नाही. ही संपूर्ण घटना हॉटेलमधील सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड करण्यात आली असून हा व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे.

Youth was killed near the Suvarn Temple in Punjab
Ganesh Visarjan : राज्यभरात लाडक्या गणरायाचे मोठ्या जल्लोषात विसर्जन!

व्हिडिओच्या सुरुवातीला रात्री एकच्या सुमारास दोन निहंग शीख एका व्यक्तीसोबत वाद घालताना दिसत आहेत. त्यानंतर त्या दोघांनी चट्टीविंग गावातील हरमनजीत सिंग यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला केला. हरमनजीत सिंग यांच्यावर हल्ला करणाऱ्या तिघांपैकी दोन निहंग शीख आणि एक वेटर होता. रमनदीप सिंग असं त्या वेटरचं नाव असून अमृतसरच्या खालसा कॉलेज येथील तो रहिवासी आहे. हल्ल्याच्या त्या व्हिडिओत रमनदीपही दिसत आहे. त्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केलीय.

Youth was killed near the Suvarn Temple in Punjab
Supreme Court : CAA ला आव्हान देणाऱ्या 200 हून अधिक याचिकांवर 12 सप्टेंबरला सुनावणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.