YouTuber मनीष कश्यपची ९ महिन्यांनंतर तुरुंगातून सुटका, बाहेर येताच बिहार सरकारला केलं टार्गेट

मनीष कश्यप आज (शनिवार) दुपारी साडेबारा वाजता बेऊर तुरुंगातून बाहेर आला. अनेक दिवसांपासून तुरुंगाबाहेर त्यांच्या समर्थकांची गर्दी जमली होती.
YouTuber Manish Kashyap
YouTuber Manish Kashyap
Updated on

YouTuber Manish Kashyap: बिहारचा यूट्यूबर मनीष कश्यप याची पाटणा उच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन मिळाल्यानंतर सुटका करण्यात आली आहे. मनीषला बिहारच्या बेऊर तुरुंगात ठेवण्यात आले होते. 9 महिन्यानंतर मनीषची तुरुंगातून सुटका झाली आहे. मनीषला सुरुवातीला तामिळनाडूला नेण्यात येणार होते, मात्र पाटणा दिवाणी न्यायालयाच्या निर्णयानंतर त्याला बिहारमध्येच ठेवण्यात आले.

मनीष कश्यप आज (शनिवार) दुपारी साडेबारा वाजता बेऊर तुरुंगातून बाहेर आला. अनेक दिवसांपासून तुरुंगाबाहेर त्यांच्या समर्थकांची गर्दी जमली होती. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून त्याला तुरुंगातून बाहेर काढण्यात आले. यावेळी त्याच्या समर्थकांनी जल्लोष केला. मनीष कश्यपला पाटणा उच्च न्यायालय, पाटणा दिवाणी न्यायालय आणि बेतिया न्यायालयातून सर्व खटल्यांमध्ये जामीन मंजूर करण्यात आला आहे. अखेर बेतिया न्यायालयाचा आदेश आल्यानंतर त्याची तुरुंगातून सुटका झाली.

बाहेर आल्यावर मनीष कश्यप म्हणाला, मी बिहार सरकारला घाबरत नाही. मी कोणाचा खून केलेला नाही. याआधी माझ्याबद्दल चुकीच्या बातम्या पसरवण्यात आल्या. नंतर जेव्हा सत्य उघड झाले तेव्हा सर्व माध्यमांनी त्याचे समर्थन केले. आता बिहार बदलण्यासाठी काम करणार असल्याचे मनीष कश्यप यांनी सांगितले. बिहारचे तरुण हे बदलतील. बिहारचा डीएनए एवढा खराब नाही की त्याला कोणाची भीती वाटावी. (Latest Marathi News)

यावेळी मनीषने बिहार सरकारवर निशाणा साधला. आज तकशी बोलताना मनीष म्हणाला, बिहारमध्ये कंसाचे सरकार आहे. माझ्या विरोधात कट रचण्यात आला. या कारणास्तव मी 9 महिने तुरुंगात राहिलो. भगवान श्रीकृष्णाचा जन्म तुरुंगात झाला होता. बिहारमध्ये असे अनेक कंस आहेत ज्यांनी माझ्याविरुद्ध कट रचला होता.

YouTuber Manish Kashyap
IMF: मोदी सरकारने IMFचा इशारा फेटाळला; अर्थ मंत्रालय म्हणाले; ''कर्ज अजूनही 2002च्या...''

काय आहे प्रकरण?

मनीष कश्यपवर तामिळनाडूमधील स्थलांतरित बिहारी मजुरांवर कथित हल्ला आणि हिंसाचाराचा बनावट व्हिडिओ बनवून प्रसारित केल्याचा आरोप आहे. बेतिया येथे त्याच्यावर खंडणी आणि मारहाणीचे गुन्हेही दाखल आहेत. बेतियाच्या एका प्रकरणात त्याने आत्मसमर्पण केले होते. अनेक प्रकरणांमध्ये ईडीने त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. तामिळनाडू पोलिसांनी त्याला मदुराईला नेले. मदुराई तुरुंगातही बराच वेळ काढावा लागला. त्यांच्यावर रासुका कायदाही लावण्यात आला. नंतर पाटणा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना बेऊर तुरुंगात ठेवण्यात आले. (Bihar News)

YouTuber Manish Kashyap
PoK Elections : पीओकेत राखीव जागांच्या शहांच्या घोषणेनंतर तिथं निवडणुका होतील का? परराष्ट्र मंत्यांनी स्पष्टच सांगितलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.