पक्षफुटीची भीती ? पक्षाची घटना बदलून जगमोहन रेड्डी YSRCPचे आजीवन अध्यक्ष

portfolio distribution Backward class got maximum ministerial posts Andhra Pradesh CM YS Jagan Mohan Reddy Amravati
portfolio distribution Backward class got maximum ministerial posts Andhra Pradesh CM YS Jagan Mohan Reddy Amravatisakal
Updated on

हैद्राबाद - मागील काही वर्षांमध्ये पक्षांमध्ये उभी फूट पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशावेळी पक्ष आणि पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार यावरून वाद होतात. महाराष्ट्रात सध्या शिवसेना पक्षावर अशी स्थिती आली आहे. मात्र आंध्रप्रदेशमध्ये वायएस जगनमोहन रेड्डी यांना वायएसआर काँग्रेस पक्षाचे (YSR Congress Party) आजीवन अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं आहे. पक्षफुटीच्या भीतीने तर आजीवन अध्यक्ष होण्याचा निर्णय जगनमोहन रेड्डी यांनी घेतला नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतोय. (YS Jagan Mohan reddy elected lifetime President)

portfolio distribution Backward class got maximum ministerial posts Andhra Pradesh CM YS Jagan Mohan Reddy Amravati
शिवसेना ताब्यात घेण्याचा भाजपचा डाव : संजय राउत

वायएसआरसीपीच्या आजीवन अध्यक्षपदासाठी जगनमोहन रेड्डी यांनी नामांकन दाखल केले होते. मात्र त्यांना कोणीही आव्हान न दिल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एकमताने रेड्डी यांना विजयी घोषित केलं. पक्षाचे सरचिटणीस व्ही. विजयसाई रेड्डी यांनी मोठ्या जनसमुदायासमोर टाळ्यांच्या गजरात जगनमोहन रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली.

बैठकीत पक्षाच्या घटनेत दोन महत्त्वपूर्ण बदल कऱण्यात आले आहेत. याआधी पक्षाचे नाव युवाजन श्रमिक रायथू काँग्रेस पार्टीवरून बदलून वायएसआर काँग्रेस पार्टी असे करण्यात येणार होते मात्र आता पक्षाचे नाव वायएसआरसीपी असे नामकरण करण्यात आले.

portfolio distribution Backward class got maximum ministerial posts Andhra Pradesh CM YS Jagan Mohan Reddy Amravati
ताब्यात घ्यायला शिवसेना म्हणजे काय युक्रेन आहे का? राऊतांचा शिंदे गटाला टोला

पक्षाच्या घटनेतील दुसरा बदल म्हणजे पक्षाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ आजीवन करणे होता. वायएसआरसीपीचे आजीव अध्यक्ष म्हणून वायएस जगनमोहन रेड्डी यांची निवड जाहीर झाली आहे. जगनमोहन रेड्डी यांनी मार्च 2011 मध्ये काँग्रेसशी संबंध तोडून YSRCP ची स्थापना केली आणि पक्षाचे अध्यक्ष बनले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.