या प्रकरणाचा सुरुवातीला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकानं (एसआयटी) तपास केला होता. पण, जुलै 2020 मध्ये ते सीबीआयकडं सोपवण्यात आलं.
माजी खासदार विवेकानंद रेड्डी यांच्या हत्येप्रकरणी (Vivekananda Reddy Murder Case) केंद्रीय अन्वेषण विभागानं (CBI) आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांचे काका वायएस भास्कर रेड्डी (YS Bhaskar Reddy) यांना अटक केली.
विवेकानंद रेड्डी हे आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांचे भाऊ आणि आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांचे काका होते.
राज्य विधानसभा निवडणुकीच्या काही आठवडे आधी 15 मार्च 2019 च्या रात्री त्यांची पुलिवेंडुला येथील त्यांच्या निवासस्थानी हत्या करण्यात आली होती. या मतदारसंघाचं त्यांच्या पुतण्यानं प्रतिनिधित्व केलंय.
माजी खासदार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचे काका विवेकानंद रेड्डी यांच्या हत्येप्रकरणी जगन रेड्डी यांचा भाऊ भास्कर रेड्डी यांना सीबीआयच्या पथकानं अटक केली आहे. या प्रकरणाचा सुरुवातीला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकानं (एसआयटी) तपास केला होता. पण, जुलै 2020 मध्ये ते सीबीआयकडं सोपवण्यात आलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.