नवी दिल्ली : भारताची अर्थव्यवस्था ही बहुतेक देशांपेक्षा चांगली असून वेगानं विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. त्यामुळं भारतात आर्थिक मंदी येण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. ब्लूमबर्गच्या सर्व्हेनुसार भारतात मंदीची शून्य शक्यता आहे, असं उत्तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी लोकसभेत दिली. महागाईवरील चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या. (Zero Chance of Recession in India FM Sitharaman answer to discussion on inflation in LS)
महागाच्या मुद्याऐवजी सभागृहात खरंतर राजकीय विषयांवरच चर्चा झाली. त्याऐवजी आर्थिक आकडेवारीवर चर्चा होणं अपेक्षित होतं. जवळपास ३० खासदार आजच्या महागाईवर बोलले. यांपैकी अनेकांनी यातील राजकीय अँगल उपस्थित केले, असंही सीतारामण यावेळी म्हणाल्या.
बिकट परिस्थितीतही आपण तग धरुन उभे आहोत तसेच वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था अशी आपली ओळक निर्माण होत आहे. याचं संपूर्ण श्रेय मी देशातील जनतेला देईल. सरकार देशातील किरकोळ महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे, असंही पुढे सीतारामण म्हणाल्या.
काँग्रेसवर टीका करताना अर्थमंत्री म्हणाल्या, युपीएच्या काळात नऊ वेळा महागाईचा दर दोन आकड्यांवर पोहोचला होता. तर सलग २२ महिने युपीएच्या काळात महागाईचा दर ९ टक्क्यांवर होता. दरम्यान, दुपारी दोन वाजेपर्यंत सभागृहाच कामकाज स्थगित करण्यात आलं होतं. त्यानंतर काँग्रेसच्या चार खासदारांचं निलंबन अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मागे घेतल्यानंतर सभागृहाचं कामकाज सुरळीत सुरु झालं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.