Zomato : झोमॅटोवरून जेवण मागवणे महागणार! ग्राहकांकडून प्लॅटफॉर्म शुल्क वसुलीला सुरुवात

Zomato
Zomato Sakal
Updated on

नवी दिल्ली - फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने आता नवीन शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. आता Zomato वरून खाद्यपदार्थ ऑर्डर करण्यासाठी ग्राहकांना प्लॅटफॉर्म फी म्हणून 2 रुपये द्यावे लागतील. अर्थातच झोमॅटो डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरून अन्न ऑर्डर करणे आता महाग होणार आहे.

Zomato
Oil Reserves In Arab : अरब देशांतच तेलाचे साठे का आहेत? आणि ते संपल्यावर अरबी लोक करणार काय?

झोमॅटोने काही प्लॅटफॉर्म फी म्हणून 2 रुपये आकारण्यास सुरुवात केली आहे. मात्र, सध्या हे ट्रायलबेसवर सुरू आहे. कंपनी प्रत्येक ऑर्डरवर प्लॅटफॉर्म शुल्क आकारेल.

कार्ट मूल्याकडे दुर्लक्ष करून सर्व वापरकर्त्यांना हे शुल्क भरावे लागेल. याशिवाय झोमॅटो गोल्ड लॉयल्टी प्रोग्राममध्ये नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना प्लॅटफॉर्म शुल्क देखील भरावे लागेल. चाचणीनंतर हे प्लॅटफॉर्म शुल्क सर्व वापरकर्त्यांसाठी आणले जाईल की नाही हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

Zomato
Shiv Sena MLA Disqualification Case: आमदार अपात्रतेबाबत लवकरच फैसला! पुढच्या आठवड्यात सुनावणीला सुरुवात

झोमॅटो या शुल्काची व्यापक प्रमाणात अंमलबजावणी करण्यापूर्वी त्याच्या परिणामाचे विश्लेषण करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. एप्रिल-जून 2023च्या तिमाहीत प्रथमच Zomato ने 2 कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे. तर गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला १८६ कोटींचा तोटा झाला होता. तथापि, या तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च रु. 1,768 कोटींवरून वाढून रु. 2,612 कोटी झाला आहे. यावरून असे दिसून येते की झोमॅटोला दीर्घकालीन नफा टिकवून ठेवण्यासाठी खर्च कमी करणे आवश्यक आहे.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) दीपंदर गोयल यांनी आपल्या भागधारकांना नुकत्याच लिहिलेल्या पत्रात व्यवसाय कमी गुंतागुंतीचा बनवण्याबद्दल विधान केलं होतं. झोमॅटो आपल्या व्यवसायात योग्य ठिकाणी योग्य लोकांना नियुक्त करत असल्याचं त्यांनी नमूद केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.