दहावी आणि बारावीचे वर्ग ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत
कणकवली : कोरोनाच्या साथीचे संक्रमण (covid -19) नियंत्रणात आल्याने आता जिल्ह्यातील दहावी आणि बारावीचे वर्ग ऑफलाइन पद्धतीने सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाने (education department) दिले आहेत. (school open) यामुळे जिल्ह्यात उद्या म्हणजेच 1 सप्टेंबरपासून माध्यमिक शाळांचे दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. कोरोनाचे नियम पाळून शैक्षणिक वर्ष ऑफलाइन सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. (offline education)
जिल्ह्यातील दहावी आणि बारावी परीक्षांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. मात्र, मागील शैक्षणिक वर्षात नववी, दहावी वर्गातील गुणांचे मूल्यमापन करण्यात आले. (konkan news) बारावीसाठीही अकरावी-बारावी वर्गातील मूल्यमापन करण्यात आले. मात्र, दहावी बारावीचा निकाल पाहता विद्यार्थ्यांच्या पदरात फारसे काही पडलेले दिसत नाही. त्यामुळे पालकांकडून दहावी-बारावीचे किमान वर्ग सुरू करावेत अशी मागणी होती.
राज्य शासनाने शाळा सुरू करण्याबाबत गेल्या दोन महिन्यात वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्या. परंतु प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्या नाहीत. आता मात्र गणेशोत्सवाच्या तोंडावर जिल्ह्यातील दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आज माध्यमिक शाळांमध्ये पालकांच्या बैठका घेऊन शासन परिपत्रकाचे वाचन केले जाणार आहे. गतवर्षीप्रमाणे कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सर्व नियमांचे पालन करून शाळा प्रशासन आणि विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये प्रवेश घेऊन प्रत्यक्षात शिक्षणाचा अनुभव घ्यावयाचा आहे. यासाठी पालकांचेही सहकार्य अपेक्षित आहे.
दहावी बारावीचे वर्ग सुरू होत असले तरी सध्या जिल्ह्यातील एसटी, बस वाहतूक सुरळीत झालेली नाही. याचा दूरगामी परिणाम शाळेतील विद्यार्थ्यांवर होणार आहे. याचे कारण शाळा ऑफलाइन पद्धतीने सुरू झाली तर ऑनलाइन पद्धतीची शिक्षण व्यवस्था बंद केली जाणार आहे. जेणेकरून विद्यार्थी शाळेमध्ये यावेत असा उद्देश शैक्षणिक संस्थांचा आहे. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या दहावी-बारावीच्या वर्गाच्या उपस्थितीबाबत काय परिस्थिती आहे. याकडे शिक्षक आणि पालक वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.