पुणे : इयत्ता अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विशेष पाचव्या फेरीत प्रवेशासाठी महाविद्यालय मिळाले असल्यास, त्या महाविद्यालयात प्रवेश घेणे आता विद्यार्थ्यांना बंधनकारक असणार आहे, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. विशेष पाचव्या फेरीनंतर आणखी दोन विशेष प्रवेश फेऱ्या होणार आहेत. या फेऱ्या संपल्यानंतर ‘दैनंदिन गुणवत्ता फेरी’ (डेली मेरीट राउंड-डीएमआर) आयोजित केली जाणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे.