Important Documents : 11वी प्रवेशासाठी लागणारी ही 10 महत्वाची कागदपत्रे ठेवा तयार

आज आम्ही तुम्हाला ११ व्या वर्गाच्या प्रवेशासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते ते जाणून घेऊया.
Important Documents
Important Documents esakal
Updated on

Important Documents : दहावीचा निकाल लागला असून आता विद्यार्थ्यांची अकरावीसाठीच्या प्रवेशासाठी धावपळ सुरु झाली आहे. बऱ्याच पालकांना आणि विद्यर्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या महत्वाच्या कागदपत्रांबाबत माहिती नसते. त्यातच तुम्ही जर मुंबई, पुण्यासारख्या शरहात मुलांची अॅडमिशन करण्यासाठी येणार असाल तर तुम्ही एखादे प्रमाणपत्र घरी सुटल्यास घरी माघारी येणेही कठीण होईन बसते. कारण प्रवेशासाठी सुद्धा विद्यालयांद्वारे ठराविक कालावधीचा अवधी देण्यात येतो.

म्हणूनच अकरावीच्या प्रवेशासाठी लागणारी सगळी कागदपत्रे आधीच तुमच्याजवळ गोळा करून ठेवावी. आज आम्ही तुम्हाला ११ व्या वर्गाच्या प्रवेशासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते ते जाणून घेऊया.

Important Documents
11th admission : 10 वी पास झाल्यानंतर पुढचा प्लॅन काय? ११ वी प्रवेशासाठीच्या चेकलीस्टमध्ये काय महत्वाचं?

अकरावीत सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स फिल्डमध्ये प्रवेशासाठी खालील कागदपत्रे महत्वाची

१) जम्न दाखला (Birth Certificate)

२) दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate)

3) रेशन कार्ड

४) ओळखपत्र फोटोसह

५) आधार कार्ड

६) घराचं इलेक्ट्रिक बिल

७) १० वीची मार्कशिट

८) जातीचे प्रमाणपत्र

९) दहावीच्या परीक्षेची हॉल तिकीट (11th Admission)

10) नॉन क्रिमीलेयर सर्टिफिकेट (Non-Creamy Layer certificate/ Income Certificate)

Important Documents
11th Admission : ग्रामीणमधील मविप्र महाविद्यालयात अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया

विद्यार्थ्यांनी ज्या महाविद्यालयांत त्यांना प्रवेश घ्यायचा आहे तिथे एकदा जाऊनसुद्धा चौकशी केली पाहिजे. प्रत्यके महाविद्यालयात नोटिस बोर्डवर महत्वाच्या सूचनांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची लिस्ट लावलेली असते. तिथूनसुद्धा तुम्ही एकदा चेक करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com