Education News : शिक्षण खात्यानं बारावी परीक्षेत केला मोठा बदल; आता पेपर असणार 'इतक्या' गुणांचा

विद्यार्थ्यांना आता वर्षभर अभ्यासाकडं लक्ष केंद्रित करावं लागणार
Education Department 12th Exam
Education Department 12th Examesakal
Updated on
Summary

बारावीचा निकाल लागल्यानंतर पुरवणी परीक्षा घेऊन देखील पुन्हा नव्याने पुरवणी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

बेळगाव : शिक्षण खात्याने (Education Department) बारावीच्या परीक्षेत (12th Exam) बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यापुढे बारावीचा वार्षिक पेपर ८० गुणांचा असणार आहे. तर २० गुण अंतर्गत मूल्यमापन आणि वर्षभरातील तीन परीक्षांमधील गुणवत्तेनुसार दिले जाणार आहेत.

Education Department 12th Exam
मोठी बातमी! जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी घेणाऱ्या दहशतवाद्यांना मंडणगडातील संशयितानं पुरवली आर्थिक रसद; ATS तपासात निष्पन्न

त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना (Students) वर्षभरात होणाऱ्या चाचणी परीक्षा व विविध प्रोजेक्ट देखील चांगल्या प्रकारे सादर करावे लागणार आहेत. अनेक वर्षांपासून बारावीची परीक्षा १०० गुणांची घेतली जाते. मात्र, आता शिक्षण खात्याने बारावीच्या परीक्षेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्षभर अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे लागणार असून शिक्षण खात्यातर्फे वर्षभरात घेतल्या जाणाऱ्या तीन चाचणी परीक्षांमध्येही चांगले गुण घ्यावे लागणार आहेत. तीन परीक्षांपैकी दोन परीक्षांमधील गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना दहा गुण दिले जाणार आहेत.

Education Department 12th Exam
महायुतीचं ठरलं! लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र लढणार; NCP च्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केली भूमिका

परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांचे दहा गुण ऑनलाईनद्वारे अपलोड केले जाणार आहेत. तर विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक दृष्टिकोन वाढावा, यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट तयार करावे लागणार आहेत. विद्यार्थ्याने प्रोजेक्ट कशाप्रकारे तयार केला आहे. यासाठी पाच गुण तर तोंडी प्रश्नांसाठी पाच गुण दिले जाणार असून, हे गुण देखील परीक्षेपूर्वी अपलोड केले जाणार आहेत.

त्यामुळे परीक्षेचा निकाल जाहीर होताना या वीस गुणांचे देखील महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेतील पेपरबरोबरच मूल्यमापनाद्वारे दिल्या जाणाऱ्या २० गुणांसाठीही चांगली तयारी करावी लागणार आहे. प्रत्येक महाविद्यालयाने परीक्षेतील बदलाबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी, अशी सूचना शिक्षण खात्याने केली आहे.

Education Department 12th Exam
Kagal Politics : कागलचं राजकारण बदलणार? एकमेकांवर आरोप करणारे मुश्रीफ-समरजित घाटगे आले एकत्र!

ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक

बारावीचा निकाल लागल्यानंतर पुरवणी परीक्षा घेऊन देखील पुन्हा नव्याने पुरवणी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ करून घेत ज्या विद्यार्थ्यांचे विषय राहिले आहेत त्यांनी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. अन्यथा अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण निर्माण होत आहे. शिक्षण खात्याच्या वेळापत्रकानुसार परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

Education Department 12th Exam
Karnataka Politics : दारुण झालेल्या पराभवानंतर भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष; 'या' बड्या नेत्यांची नावं चर्चेत

पेपर ८० गुणांचा होणार असून, २० गुण अंतर्गत मूल्यमापन आणि वर्षभरात घेतल्या जाणाऱ्या तीन परीक्षांमधील गुणांच्या आधारे दिले जाणार आहेत. परीक्षेत केल्या जाणाऱ्या बदलाबाबत विषयांच्या प्राध्यापकांना माहिती दिली आहे.

-एम. एम. कांबळे, गटशिक्षणाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.