Teacher Recruitment : राज्यात 13,500 शिक्षकांच्या जागा भरणार; सरकारचा मोठा निर्णय

काँग्रेस सरकारने (Congress Government) शिक्षक भरतीप्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.
Teacher Recruitment
Teacher Recruitmentesakal
Updated on
Summary

राज्यात तीस हजारांहून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत.

बेळगाव : राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या काँग्रेस सरकारने (Congress Government) शिक्षक भरतीप्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १३,५०० शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया जुलैअखेरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.

या निर्णयामुळे सरकारी शाळांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षभरात सुरू असलेली शिक्षकभरती (Teacher Recruitment) प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, राज्यात पंधरा हजार शिक्षकांच्या भरतीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, शिक्षक भरतीसाठी गुणवत्ता परीक्षा घेतल्यानंतर राज्यभरात १३,५०० शिक्षक पात्र ठरले होते.

Teacher Recruitment
Sant Balumama : संत बाळूमामा देवस्थान समितीचा भ्रष्ट कारभार; गंभीर आरोप करत पडळकरांची फडणवीसांकडं तक्रार

त्यानंतर शिक्षण खात्याने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पात्र उमेदवारांची तात्कालीक यादी जाहीर केली होती. यादीबाबत आक्षेप घेत काही जणांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे भरतीप्रक्रिया रखडण्याची चिन्हे निर्माण झाली होती. मात्र, उच्च न्यायालयाने यादी रद्द करून नवीन यादी तयार करण्याची सूचना केली.

Teacher Recruitment
Shivendraraje Bhosale : राजकारणासाठी 'हे' करणं चुकीचं; भाजप आणि PM मोदींनी नेहमीच छत्रपतींचा सन्मान केलाय!

त्यानुसार शिक्षण खात्याने भरती प्रक्रियेसाठी लागू केलेल्या अधिसूचनेनुसार पात्र उमेदवारांची सुधारित यादी जाहीर केली. त्यानंतर पुन्हा आक्षेप मागवून शिक्षण खात्याने काही दिवसांपूर्वी अंतिम यादी जाहीर केली. तसेच पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम देखील पूर्ण केले आहे.

राज्यात तीस हजारांहून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे १३,५०० शिक्षकांच्या भरतीनंतरही दरवर्षी काही प्रमाणात शिक्षकांच्या जागा भरती करण्यासाठी टीईटी व सीईटी घेण्याचा निर्णय देखील शिक्षण खात्याने घेतला आहे. त्यामुळे अनेक शाळांना मोठा दिलासा मिळणार आहे. नव्याने भरती केल्या जाणाऱ्या शिक्षकांच्या जागा सहावी ते आठवीसाठी भरती केल्या जाणार आहेत. यामध्ये मराठी माध्यमाच्या ६५ शिक्षकांचा देखील समावेश आहे.

Teacher Recruitment
Kolhapur : दूधगंगा नदी पात्रात आढळल्या 4 मानवी कवट्या; सांगाडा गायब; परिसरात खळबळ

पोलिस पडताळणीला सुरुवात

शिक्षक भरतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या पोलिस पडताळणीला सुरुवात झाली आहे. पोलिस पडताळणी हा शिक्षक भरती प्रक्रियेचा एक भाग असल्याची माहिती शिक्षण खात्याने दिली आहे. शिक्षक भरती पारदर्शकपणे पार पडावी यासाठी शिक्षण खाते प्रयत्नशील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.