CBSE Result : ३ वर्षांची असताना अॅसिड हल्ल्यात डोळे गेले; दहावीत मिळवले ९५%

आई-वडिलांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानताना कॅफीने सांगितले की, तिला हे यश तिच्या पालकांच्या मानसिक पाठिंब्यामुळे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे मिळाले.
CBSE Result
CBSE Result google
Updated on

मुंबई : देशातील अनेक मुलींसाठी एक उदाहरण प्रस्थापित करत अॅसिड हल्ल्यातून वाचलेली आणि शिपायाची मुलगी, कॅफीने सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेत ९५.०२ टक्के गुण मिळवून शाळेत अव्वल स्थान पटकावले. १५ वर्षीय कॅफीचे वडील सचिवालयात शिपाई म्हणून काम करतात.

जेव्हा कॅफी ३ वर्षांची होती तेव्हा तिच्या शेजाऱ्यांनी मत्सरामुळे तिच्यावर अॅसिड हल्ला केला, त्यानंतर तिचा संपूर्ण चेहरा जळाला आणि तिला ६ वर्षांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले जेथे तिचे डोळे गेले.

तेव्हापासून ती ब्रेल लिपीद्वारे अभ्यास करत आहे आणि ती खूप वेगाने वाचू शकते. याचाच परिणाम म्हणून तिला १०वीत ९५.०२ टक्के गुण मिळाले. (15 year old acid attack survivor kafi got 95% in CBSE board exam )

CBSE Result
Knee Surgery : गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर या गोष्टी टाळा

एएनआयशी बोलताना कॅफीने सांगितले की, तिला आयएएस अधिकारी बनायचे आहे आणि तिच्या पालकांना अभिमान वाटावा अशी इच्छा आहे. तिला भूगोल हा विषय आवडतो.

आई-वडिलांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानताना कॅफीने सांगितले की, तिला हे यश तिच्या पालकांच्या मानसिक पाठिंब्यामुळे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे मिळाले. यूट्यूब आणि इंटरनेटने तिला परीक्षेच्या तयारीसाठी खूप मदत केल्याचे तिने सांगितले.

आपल्या मुलीच्या यशाबद्दल कॅफीच्या वडिलांनी सांगितले की, "आम्हाला कॅफीचा अभिमान आहे आणि तिला पुढे जे काही करायचे आहे त्यात तिला साथ देणार आहोत आणि तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करू."

CBSE Result
Mumbai Bridge : कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणार आणखी एक पूल

कॅफीच्या वडिलांनी सांगितले की, जेव्हा अॅसिड हल्ला झाला तेव्हा त्यांचे मनोबल खचले होते. एका चांगल्या व्यक्तीच्या सल्ल्याने त्यांनी कॅफीला शिकवण्याचा निर्णय घेतला आणि आज कॅफीने तो निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले आहे.

आपला आनंद व्यक्त करताना कॅफीची आई म्हणाली, "कॅफी अभ्यासात हुशार आहे आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे. यामुळे आम्हाला समाजात मान उंच करून चालण्याची संधी मिळाली आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.