RTE Admission 2024 : परभणी जिल्ह्यात जुलैअखेर ‘आरटीई’त फक्त २०५ प्रवेश निश्चित; पालकांच्या तक्रारीही वाढल्या

RTE Admission row latest news |सन २०२४-२५ या वर्षात आरटीई २५ टक्के राखील प्रवेश प्रक्रियेत मोठा गोंधळ उडाला. त्यामुळे जुनमध्ये सुरू झालेली प्रवेश प्रक्रीया थांबली होती.
परभणी जिल्ह्यात जुलैअखेर ‘आरटीई’त फक्त २०५ प्रवेश निश्चित
परभणी जिल्ह्यात जुलैअखेर ‘आरटीई’त फक्त २०५ प्रवेश निश्चितSakal
Updated on

परभणी : जिल्ह्यात आरटीई अंतर्गत इयत्ता पहिली वर्गासाठी केवळ फक्त २०५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातच प्रवेशाची प्रक्रिया अतिशय संथगतीने सुरू आहे. अगोदरच बालकांचे दोन महिने गेले असून पुढे किती दिवस शाळेपासून दूर राहणार हे मात्र अनिश्चित आहे.

सन २०२४-२५ या वर्षात आरटीई २५ टक्के राखील प्रवेश प्रक्रियेत मोठा गोंधळ उडाला. त्यामुळे जुनमध्ये सुरू झालेली प्रवेश प्रक्रीया थांबली होती. परंतु, आता कुठे ऑनलाईन अर्जाचे सोपस्पर पूर्ण होऊन थेट विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाला सुरुवात झाली आहे.

जिल्ह्यात आरटीई अंतर्गत येणाऱ्या शाळांची संख्या २०६ आहे. या शाळांमधील एक हजार ५६४ जागा या प्रवेशासाठी राखीव आहेत. तर ऑनलाईन तीन हजार १४५ अर्ज आले होते. त्यातून निकषानुसार एक हजार २५३ बालकांची निवड यादी जाहीर झालेली आहे. त्यापैकी केवळ २०५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत. अजुनही मोठ्या संख्येने विद्यार्थी कधी प्रवेश मिळेल या प्रतीक्षेत आहेत.

परभणी जिल्ह्यात जुलैअखेर ‘आरटीई’त फक्त २०५ प्रवेश निश्चित
Education Policy : मोफत शिक्षणावरून राज्य सरकारला उपरती;शुल्क प्रतिपूर्तीसाठी ‘जुन्या जीआर’च्या अंमलबजावणीसाठी ‘नवा जीआर’

प्रवेश प्रक्रियेविरुद्ध वाढत्या तक्रारी

एकीकडे आरटीई अंतर्गत बालकांची प्रवेश प्रक्रीया सुरू असताना दुसरीकडे तक्रारी देखील वाढल्या आहेत. शिक्षण विभागाने प्रवेशासाठी शाळा निश्चित करून पत्र दिलेले असताना देखील संबंधित पालकांनी त्या परिसरात ती शाळा कुठेच आढळून आली नव्हती.

शाळेने स्थलांतर केले की, शाळेने नाव बदलले याबद्दल काहीच माहिती मिळत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शाळेचा शोध लावण्याची, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून प्रवेश मिळवून देण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

परभणी जिल्ह्यात जुलैअखेर ‘आरटीई’त फक्त २०५ प्रवेश निश्चित
RTE Admission : ‘आरटीई’तून ८०१ प्रवेश निश्चित; प्रवेशासाठी उरले शेवटचे दोन दिवस

खोट्या भाडेकरारनाम्यांची चौकशी करावी

आरटीई प्रवेशासाठीच्या शाळांमध्ये नियमाप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबवावी, लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची व निवासस्थानाची स्थळ पाहणी कसून करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेश संघटक कृष्णा कटारे यांनी सोमवारी (ता.२९) प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे.

अनेक शाळांमध्ये इयत्ता पहिलीला शंभराच्या वर विद्यार्थी संख्या असून तिथे २५ टक्के नियमाप्रमाणे २५ लाभार्थ्यांची निवड होणे अपेक्षित आहे. परंतु, तेथे १० ते १२ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे २५ टक्केची अट पूर्ण झालेली नाही. याची माहिती घेतली असता शहरातील अनेक शाळांची शासन दरबारी एकच तुकडीची नोंद आहे.

परंतु, प्रत्यक्षात मात्र तीन-तीन तुकड्या आहेत. त्यामुळे तेथे पटसंख्येच्या २५ टक्के प्रवेश देण्यात यावेत. तसेच खोटे भाडेकरारनामे व चुकीचे लोकेशन दाखवून अनेकांनी लाभ घेतला आहे. त्यामुळे निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करावी व स्थळ पाहणी कसून करण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.