कोरेगाव (सातारा) : राज्यातील मुंबईसह (Mumbai) ३५ जिल्ह्यांतील ३५८ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील Industrial Training Institute (ITI) विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज दाखल करण्याच्या कालच्या शेवटच्या दिवसअखेर दोन लाख ५७ हजार १३४ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. आज (ता. दोन) सर्व संस्थांमध्ये गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. सातारा जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील ११ संस्थांमधील तीन हजार २३६ जागांसाठी सात हजार ४९४ अर्ज दाखल झाले आहेत.
आयटीआयसाठी १५ जुलैपासून ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाली.
आयटीआयसाठी १५ जुलैपासून ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाली. त्यात विविध व्यवसायी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी ३१ ऑगस्ट ही अखेरची तारीख निश्चित केलेली होती. त्यानुसार या प्रवेश प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. दाखल अर्जांची आज (ता. दोन) गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यानंतर सहा ते २५ सप्टेंबरअखेर चार फेऱ्यात प्रवेश निश्चित होणार आहेत. राज्यात सर्वाधिक अर्ज नाशिक जिल्ह्यातील १५ संस्थांत १४ हजार २८८, तर सर्वात कमी गडचिरोली जिल्ह्यातील १२ संस्थांत दोन हजार ४१ अर्ज दाखल झाले आहेत.
जिल्हा, आयटीआय संख्या आणि कंसात एकूण पात्र प्रवेश अर्ज : अकोला - सात (८२७३). अमरावती - १४ (१२४४५). बुलडाणा - १३ (९९५९). वाशीम - सहा (४७२२). यवतमाळ - १६ (१०६५७). औरंगाबाद - नऊ (९१७९). बीड - ११ (८२८२). हिंगोली - पाच (३१६१). जालना - आठ (६०४५). लातूर - दहा (८७९५). नांदेड - १६ ( ९८४०). उस्मानाबाद - आठ (३८७०). परभणी - नऊ (५४३७). पालघर - आठ (५५०१). रायगड - १५ (८७८४). रत्नागिरी - नऊ (४२२५). सिंधुदुर्ग - आठ (२३१२). ठाणे - सात (१०२६३). भंडारा - सात (४५३१). चंद्रपूर - १५ (७७२४). गडचिरोली - १२ (२१४१). गोंदिया - आठ (५७२१). नागपूर - १४ (९८७६). वर्धा - आठ (३८७६). नगर - १४ (८३४०). धुळे - चार ( ४३४८). जळगाव - १५ ( १२५९०). नंदुरबार - सहा (३१०३). नाशिक - १५ (१४२८८). कोल्हापूर - १२ (८३१८). पुणे - १३ (१२९०३). सांगली - दहा (६०७९). सातारा - ११ (७४९४). सोलापूर - ११ (७५२७). मुंबई शहर दाखल अर्ज २९१४, मुंबई (अंधेरी) ५०२, मुंबई (बोरिवली) ८५२ व मुंबई (कुर्ला) २२५७.
सातारा जिल्ह्यातील तालुकानिहाय आयटीआय, एकूण जागा व दाखल प्रवेश अर्ज...
तालुका - जागा - दाखल अर्ज
जावळी (मेढा)...१५२... २३९
कऱ्हाड ... ९००...१६७४
खंडाळा (लोणंद) ... २९२...३३८
खटाव (औंध) ...१४४... ६५६
कोरेगाव ...१९२ ...६३५
महाबळेश्वर (गोडवली- पाचगणी) ...१०८. ...११४
माण (दहिवडी)...१०८ ...५०३
पाटण (यराड) ...१४८ ...७६२
फलटण ...१०४ ...८०३
सातारा ...८७६ ...१३०७
वाई ...२१२ ....४६३
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.