Jobs : केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांत 3261 सरकारी नोकऱ्या!

केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांत 3261 सरकारी नोकऱ्या! दहावी, बारावी व पदवी उत्तीर्णांसाठी संधी
Jobs
JobsGallery
Updated on
Summary

केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांतर्गत विभाग आणि संस्थांमध्ये सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी चालून आली आहे.

सोलापूर : केंद्र सरकारच्या (Central Government) विविध मंत्रालयांतर्गत (Ministry) विभाग आणि संस्थांमध्ये सरकारी नोकरीसाठी (Jobs) इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी चालून आली आहे. स्टाफ सिलेक्‍शन कमिशन (Staff Selection Commission - SSC) ने 24 सप्टेंबर 2021 रोजी मॅट्रिक्‍युलेशन (10 वी), उच्च माध्यमिक (10+2), ग्रॅज्युएशन, केंद्रीय स्तर आणि संस्थांमध्ये उच्च स्तरावरील एकूण 3261 पदांच्या भरतीसाठी (Recruitment) जाहिरात प्रसिद्ध केली होती.

एसएससी सिलेक्‍शन पोस्ट फेज 9 परीक्षा 2021 च्या माध्यमातून एकूण नऊ क्षेत्रांमध्ये तीन हजारांहून अधिक पदांवर भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी उमेदवार 25 ऑक्‍टोबर 2021 पर्यंत आयोगाच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर अर्ज करू शकतात.

Jobs
रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदांची जम्बो भरती! 4 ऑक्‍टोबरपासून करा अर्ज

जाणून घ्या पात्रता

निवड पोस्ट फेज 9 अंतर्गत घोषित केलेल्या तीन स्तरांच्या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित स्तराची किमान पात्रता अर्थात दहावी किंवा बारावी किंवा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, 1 जानेवारी 2021 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे.

असा करा अर्ज

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना एसएससीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर मेन पेजवर दिलेल्या लॉगइन विभागात "न्यू युजर? रजिस्टर हियर' या लिंकवर क्‍लिक करा. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि इतर तपशील भरून नवीन पेजवर नोंदणी करा. त्यानंतर वाटप नोंदणी क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करून निवड पोस्ट फेज 9 अंतर्गत जाहिरात केलेल्या पदांसाठी आपण आपला अर्ज सबमिट करू शकता. अर्जादरम्यान, 100 रुपये शुल्क देखील भरावे लागेल, जे ऑनलाइन पद्धतीने भरले जाऊ शकते. अर्ज शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्‍टोबर 2021 आहे, तर ऑफलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क 1 नोव्हेंबर 2021 पर्यंत भरता येईल.

'या' विभागात आहेत रिक्त पदे...

कर्मचारी निवड आयोगाने एकूण 9 क्षेत्रांमध्ये दहावी, बारावी आणि पदवी स्तराच्या एकूण 3261 पदांसाठी निवड पोस्ट फेज 9 परीक्षा 2021 आयोजित करण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या ज्या मंत्रालयांमध्ये रिक्त जागा घोषित करण्यात आल्या आहेत त्यामध्ये संरक्षण मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालय, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, श्रम मंत्रालय, पर्यावरण आणि वन मंत्रालय, संस्कृती मंत्रालय, जलसंपदा मंत्रालय आदी विविध क्षेत्रांमध्ये रिक्त जागा भरली जाणार आहेत.

Jobs
नोव्हेंबरमध्ये 19 हजार पदांची भरती! आठवड्यात 'MPSC'ला मागणीपत्र

ही आहेत रिक्त पदे...

  • गर्ल्स कॅडेट इन्स्पेक्‍टर (मध्य प्रदेश) - 34

  • मल्टी टास्किंग स्टाफ (पूर्व विभाग) - 398

  • मल्टी टास्किंग स्टाफ - तांत्रिक (पूर्व विभाग) - 78

  • संशोधन सहाय्यक (पूर्व विभाग) - 146

  • रासायनिक सहाय्यक (एमपीआर) - 92

  • सहाय्यक दळणवळण अधिकारी (उत्तर प्रदेश) - 52

  • लस्कर -1 (उत्तर प्रदेश)-142

  • एमटी मदतनीस (कॉन्स्टेबल), मेकॅनिकल - दिल्ली पोलीस (NW) - 104

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()