Railway Jobs : 10वी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी! रेल्वेत 3 हजारांहून अधिक जागा; कुठे अन् कसा भरणार अर्ज? जाणून घ्या
सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असलेल्यांसाठी एक मोठी संधी समोर आली आहे. रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी रेल्वेकडून ३ हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
रेल्वे भरती सेल (RRC) पश्चिम मध्य रेल्वे(WCR), जबलपूरकडून ॲप्रेंटिस पदांवर बंपर भरती केली जात आहे. यासाठी प्रक्रिया सध्या सुरू आहे. आरआरसीच्या या रिक्त जागांसाटी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ५ ऑगस्टपासून सुरू करण्यात आली आहे. ॲप्रेंटिस पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०२४ निश्चित करण्यात आली आहे.
पदे किती आहेत?
रेल्वे भरती सेल- पश्चिम मध्य रेल्वेकडून ३३१७ ॲप्रेंटिस पदांसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. सर्व डिटेल्स आणि अपडेटसाठी तुम्ही आरआरसी डब्ल्यूसीआरच्या ऑफिशियल वेबसाइटवर उपलब्ध भरती नोटिफिकेशन पाहू शकता.
पात्रता काय आहे?
ॲप्रेंटिस पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून किमान ५० टक्के गुणांसह १०वी पास असणे आवश्यक आहे. तसेच मेडिकल लॅब टेक्नीशियन पदांसाठी अर्ज करणाऱ्यांनी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पास असणे गरजेचे आहे.
वयाची मर्यादा
अर्जदारांचे वय ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत १५ वर्षांहून कमी आणि २४ वर्षांहून जास्त असू नये. मात्र आरआरसी डब्ल्यूसीआर नियमांनुसार वयात सूट दिली जाईल.
अशी होणार निवड
अपरेंटिस पदासाठी उमेदवारांची निवड १०वीची परीत्रा (किंवा समकक्ष) आणि आयटीआय/ट्रेडमध्ये मिळालेले गुणांच्या आधारे तयार केलेल्या मेरिट लिस्टच्या आधारावर केली जाईल.
या पदांच्या अर्जासाठी शुल्क जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या उमेदवारांना १४१ रुपये. एससी, एसटी, पीएच आणि महिला उमेदवारांना ४१ रुपये आहे.
आवश्यक कागदपत्रे
पासपोर्ट आकाराचा लेटेस्ट फोटो
१०वीची मार्कशीट आणि सर्टिफिकेट
१२वीची मार्कशीट आणि सर्टिफिकेट (मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी)
आयटीआय सर्टिफिकेट आणि मार्कशीट (एनसीव्हीटी/ एससीव्हीटीकडून जारी केलेले)
अर्ज कसा करणार?
सर्वप्रथम आरआरसी डब्ल्यूसीआरच्या अधिकृत वेबसाईट wcr.Indianrailways.gov.in वर जा
यानंतर '2024-25 के लिए एक्ट अपरेंटिस की इंगेजमेंट' च्या लिंकवर क्लिक करा.
यानंतर न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करा आणि प्रक्रिया सुरू करा.
लॉग इन केल्यानंतर अर्ज भरा आणि कादगपत्रे अपलोड करून शुल्क भरा.
यानंतर पुढील संदर्भासाठी अर्जाची प्रत प्रींट करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.