पंजाब पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर पाेलिस भरतीसंदर्भात एक छोटी अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये 560 पाेलिस उपनिरिक्षकांची भरती करणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पंजाब पोलिसांच्या punjabpolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध केले जाणार आहेत. (560-posts-of-police-sub-inspectors-in-4-cadres-punjab)
सुमारे तीन कोटी नागरिकांचे जीवन सुरक्षित बनविण्याच्या आमच्या मिशनवर आपण @punjabpoliceind मध्ये सामील होऊ इच्छिता का? असा प्रश्न ही पंजाब पोलिसांनी युवा वर्गाससह महिलांना केला आहे. पंजाब पोलिसांनी ट्विटच्या माध्यमातून हे आवाहन केले आहे.
सुमारे 560 पाेलिस उपनिरिक्षकांच्या भरतीसाठी येत्या पाच जूलैपासून अर्ज खुले करण्यात येणार आहेत. लेखी परीक्षा 17 ते 31 आॅगस्ट 2021 या कालावधीत हाेईल असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तरी अर्ज करू इच्छिणा-यांनी शैक्षणिक पात्रता, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम इत्यादींचा तपशिल जाणून घ्यावा असे आवाहन केले आहे.
अशी भरणार पदे
Investigation (289), Armed (97), District (87) & Intelligence (87)
शैक्षणिक पात्रता
Intelligence पदा व्यतरिक्त इच्छुक उमेदवार हे पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
1 जानेवारी 2021 रोजी उमेदवारांचे वय 18-28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. जे लेखी परीक्षेस पात्र ठरतील ते शारीरिक तपासणी चाचणीसाठी उपस्थित राहतील.
लेखी चाचणी अभ्यासक्रम
1. गणितीय / तर्क / तार्किक क्षमता
२. भाषा कौशल्ये (पंजाबी / इंग्रजी)
मूलभूत संगणक ज्ञान
Current. चालू घडामोडी आणि भारताचे सामान्य ज्ञान
Constitution. भारतीय राज्यघटनेचे मूलभूत ज्ञान, भारतीय फौजदारी न्याय प्रणालीच्या संस्था इ.
अर्ज कसा करावा?
ज्या पदास पात्र आणि पोस्टमध्ये रस असेल ते अधिकृत संकेतस्थळावर punjabpolice.gov.in जाऊन अर्ज करू शकतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.