'आरोग्य'साठी 570 परीक्षार्थी प्रतीक्षेत

Health Department
Health Departmentesakal
Updated on

सातारा : जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाची (Zilla Parishad Health Department) जम्बो भरती प्रक्रिया ऐनवेळी पुढे ढकलल्याने शासनाचा विस्कळित कारभार चव्हाट्यावर आला आहे. या प्रक्रियेत सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील गट ‘क’ व ‘ड’मधील विविध पदांसाठी ५७० उमेदवार परीक्षा देणार होते. मात्र, भरतीची प्रक्रिया रखडल्याने परीक्षार्थींमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Summary

आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडू लागल्याने शासनाने कंत्राटी डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती.

कोरोनाच्या काळात आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडू लागल्याने शासनाने कंत्राटी डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. मात्र, आता कोरोना काही प्रमाणात आटोक्यात आल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे, कर्मचाऱ्यांची रिक्त पदे कायमस्वरूपी तत्त्वावर भरण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांतील आरोग्य विभागात भरती प्रक्रिया २०१९ मध्ये जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर उमेदवारांनी संकेतस्थळावर ऑनलाइन फॉर्म भरले. मात्र, आतापर्यंत तीन वेळा भरती प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे.

Health Department
BJP-NCP आमदारांच्या वादात 'रामाची' उडी; 'मध्यस्थी' येणार कामी?

दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात औषध निर्माता ११, आरोग्य सेवक (पुरुष) २०८, आरोग्य सेविका (महिला) ३४७, प्रयोगशाळा तंत्रज्ञ चार अशी पदे भरण्यात येणार आहेत. दरम्यान, राज्यभरात विविध पदांसाठीची परीक्षा १७ व १८ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली होती. मात्र, शासनाने परिपत्रक काढून भरती प्रक्रिया पुढे ढकलत असून, परीक्षेची तारीख नंतर सांगण्यात येईल, असे जाहीर केले आहे. मात्र, सततच्या या प्रकारामुळे परीक्षार्थी उमेदवारांना मानसिक त्रास होत असून, त्यांनी शासनाच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे.

‘न्यासा’ची अकार्यक्षमता

आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी शासनाने न्यासा या खासगी संस्थेला दिली आहे. मात्र, या संस्थेला भरतीसाठी लागणारी परीक्षेची तयारी करता न आल्याने शासनावर परीक्षा रद्द करण्याची नामुष्की आली आहे. त्यामुळे, शासनाने भरती प्रक्रिया दुसऱ्या खासगी संस्थेला द्यावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.

Health Department
मेडिकल कॉलेजची टेंडर प्रक्रिया लांबणार

‘‘आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया सतत पुढे ढकलली जात असल्याने मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले. आता कायमस्वरूपी तत्त्वावर घेण्यात येणाऱ्या परीक्षेतही शासनाने भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी न्यासा या खासगी कंपनीच्या अनागोंदीचा फटका उमेदवारांना बसत आहे.’’

-संदीप जगताप, परीक्षार्थी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()