Government School : तब्बल 624 शाळांवर येणार गंडांतर? सरकारकडून 'या' शाळा बंद करण्याच्या हालचाली, विद्यार्थ्यांचं होणार नुकसान!

राज्यात २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा लवकरच बंद करण्याचा घाट राज्य शासनाने घेतला आहे.
Maharashtra Government Schools
Maharashtra Government Schoolsesakal
Updated on
Summary

राज्य शासनाने पटसंख्या कमी असणाऱ्या शाळा बंद केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

सातारा : राज्य सरकारच्या (Maharashtra Government) ० ते २० पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील दहा व वीस पटसंख्याहून कमी असणाऱ्या शाळा (School) आणि शिक्षकांची माहिती एकत्रीकरणाचे काम सुरू आहे.

राज्य शासनाने येत्या काळात कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्यास जिल्ह्यातील ६२४ शाळांवर गंडांतर येणार आहे. राज्यात २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा लवकरच बंद करण्याच्या घाट राज्य शासनाने घेतला आहे.

Maharashtra Government Schools
Maratha Reservation : तुमच्यात हिंमत असेल तर मराठा आरक्षणाचा तत्काळ वटहुकूम काढा; सतेज पाटलांचं सरकारलाच चॅलेंज

गेल्या सहा महिन्यांपूर्वी राज्यातील शून्य ते वीस शाळा किती आहेत? त्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने (Education Department) प्राथमिक विभागाकडून मागवली होती. त्यामुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळा लवकरच बंद होण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, या निर्णयाला ग्रामीण भागातील पालक आणि शिक्षक विरोध करत आहेत.

२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद झाल्यास दुर्गम भागातील आदिवासी पाड्यातील मुलामुलींचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. शिक्षणाच्या प्रवाहापासून दुर्गम भागातील विद्यार्थी दूर जातील. शिवाय शाळाबाह्य मुलांच्या संख्येत भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. केवळ पटसंख्या कमी म्हणून हा निष्कर्ष गृहीत धरून शाळा बंद करणे हा विद्यार्थ्यांना अन्याय ठरणारा असल्याचे मत पालक, शिक्षक वर्गातून येत आहे.

Maharashtra Government Schools
Ichalkaranji Bandh : जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; इचलकरंजीत कडकडीत बंद, तब्बल 430 कोटींची उलाढाल ठप्प

दरम्यान, जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण तीन हजार २५ शाळा आहेत. त्यातील ६११ शाळांमध्ये २० हून कमी पटसंख्या आहे. याचबरोबर खासगी अनुदानित एक शाळा आहे. बारा शाळा स्वयंअर्थतत्त्वावर चालणाऱ्या आहेत. अशा २० पटसंख्याहून कमी असणाऱ्या जिल्ह्यात एकूण ६२४ शाळा आहेत. याचबरोबर पटसंख्या कमी असणाऱ्या शाळांत कार्यरत शिक्षकांचीही माहिती मागवली आहे. जिल्ह्यात सर्व विद्यार्थी, शिक्षकांची माहिती जिल्हा परिषदेने एकत्रित केली आहे. आठवड्याभरात ती पाठविण्यात येणार आहे.

Maharashtra Government Schools
Maratha Reservation : संभाजीराजेंना उपोषण करावं लागलं, तेव्हा फडणवीसांनीच मराठा समाजाला..; आरक्षणाबाबत महाडिकांचं मोठं वक्तव्य

चार ते पाच शाळा एकत्र?

प्रायोगिक तत्त्वावर वीसहून कमी पटसंख्या असणाऱ्या चार ते पाच शाळांचे एकाच शाळेत समायोजन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यात विद्यार्थ्यांना शाळेत पोचविण्याची सोय पालकांनी करावयाची आहे. त्याचा भत्ता शासनाकडून पालकांना मिळणार आहे. या सर्वांना युडाएस एकच असेल.

राज्य शासनाने पटसंख्या कमी असणाऱ्या शाळा बंद केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना घरापासून दूर शाळेत जावे लागल्यास वन्यप्राण्यांचा धोका व पावसाळ्यातील गैरसोयींचाही सामना करावा लागणार आहे. याबाबत राज्य शासनाने निर्णय घेताना विचारपूर्वक घेतला पाहिजे.

प्रमोद जगताप, पालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.