The Village Gita : सुमारे ७० वर्षांपूर्वी एका राष्ट्रसंतानेदेखील संपूर्ण देशाच्या विकासाचे मूळ असलेल्या ग्रामसुधारणेचा आराखडा मांडला. तो इतका व्यापक आणि सर्वसमावेशक आहे, की त्याला गावाच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासाची गीता संबोधले गेले.
सध्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने आपल्याला राज्याच्या विकासाच्या धोरणांबाबतच्या चर्चाही ऐकायला मिळत आहेत. त्याअनुषंगाने आज काहीशा विस्मरणात गेलेल्या, परंतु एका अप्रतिम ग्रंथाची ओळख आपण करून घेणार आहोत.