AAI Recruitment : परीक्षा न देताच एअर इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, भरती प्रक्रिया सुरू

एअर इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.
AAI Recruitment 2023
AAI Recruitment 2023esakal
Updated on

AAI Recruitment : एअर इंडियामध्ये नोकरी करण्याचे अनेक तरूणांचे स्वप्न असते. जर तुम्ही देखील एअर इंडियामध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

एअर इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. AAI Cargo Logistics and Allied Services Company Limited (AAICLAS) ने संपूर्ण भारतात सिक्युरिटी स्क्रिनर (फ्रेशर) च्या पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या पदांवर भरती करण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या पदांवर अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवारांनी ८ डिसेंबर किंवा त्यापूर्वी AAICLAS च्या अधिकृत वेबसाईटवर aaiclas.aero वर जाऊन अर्ज करावेत.

AAI Recruitment 2023
SSC GD Constable : दहावी पास उमेदवारांसाठी केंद्रीय सशस्त्र दलामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ७५,७६८ पदांवर भरती सुरू

किती पदांवर केली जाणार भरती ?

या भरती अंतर्गत तब्बल 906 सिक्युरिटी स्क्रिनर (फ्रेशर) च्या रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. जे उमेदवार या पदांवर अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांनी AAICLAS च्या अधिकृत वेबसाईटवर aaiclas.aero वर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.

उमेदवाराची पात्रता आणि वयोमर्यादा

या पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड, विद्यापीठ किंवा संस्थेतील पदवी मिळवलेली असावी. या पदांसाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांनी पदवीला ६०% गुण आणि SC/ST उमेदवारांनी 55% गुण असणे आवश्यक आहे.

शिवाय,या पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराचे कमाल वय हे 27 वर्षे असावे. जर यापेक्षा वय जास्त असेल तर ते उमेदवार अर्ज करू शकत नाहीत.

अर्ज करण्यासाठी किती शुल्क ?

या पदांसाठी इच्छुक असलेल्या सामान्य/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क हे  ७५० आहे तर महिला आणि SC/ST आणि EWS उमेदवारांसाठी १०० रूपये अर्ज शुल्क असणार आहे.

AAI Recruitment 2023
HSC Result: बारावीनंतर नोकरी करायची आहे ? रेल्वेमध्ये करा उत्तम करिअर, टीटीई होण्यासाठी अशी करा तयारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.