Shivaji University : परीक्षेत कॉपी करत असाल, तर वेळीच सावध व्हा! विद्यापीठानं 648 विद्यार्थ्यांवर केलीये मोठी कारवाई

या कारवाईने उन्हाळी सत्रातील परीक्षांचा निकाल सरासरी ३० टक्क्यांनी घटला
Shivaji University
Shivaji Universityesakal
Updated on
Summary

आजअखेर या दोन्ही भरारी पथकांनी एकूण ७७९ परीक्षार्थी विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले.

कोल्हापूर : गेल्या तीन महिन्यांत पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेत कॉपी (गैरमार्गाचा अवलंब) करणाऱ्या ६४८ विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाने (Shivaji University) कारवाईचा दणका दिला आहे. त्यात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

‘कॉपी’ला (Exam Copy) आळा घालण्यासाठी विद्यापीठाने भरारी, बैठ्या पथकांच्या माध्यमातून केलेल्या कारवाईने उन्हाळी सत्रातील परीक्षांचा निकाल सरासरी ३० टक्क्यांनी घटला आहे. कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षण, परीक्षा झाल्या. त्यात कॉपी प्रकरणांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले.

Shivaji University
NCP Crisis : 15 ऑगस्टनंतर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप! राष्ट्रवादीचा मोठा गट अजितदादांसोबत जाणार? जयंत पाटलांचंही नाव चर्चेत

या प्रकरणांना आवर घालण्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने यावर्षी हिवाळी सत्रातील परीक्षांसाठी प्रायोगिक तत्त्वावर विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १८ परीक्षा केंद्रांवर बैठे पथक तैनात केले. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील १०, सांगली ३ आणि सातारा जिल्ह्यातील ५ केंद्रांचा समावेश होता. या पथकांसह प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रत्येकी ३ भरारी पथके २५ मे पासून कार्यन्वित ठेवली.

Shivaji University
साताऱ्याच्या आदितीनं रचला इतिहास! तिरंदाजीत बनली भारताची पहिली वर्ल्ड चॅम्पियन, उदयनराजेंनी केलं खास कौतुक

त्यानंतर आजअखेर या दोन्ही भरारी पथकांनी एकूण ७७९ परीक्षार्थी विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले. त्यावर परीक्षा प्रमाद समितीच्या चौकशीनंतर ६४८ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. उर्वरीत १३१ जणांच्या कॉपी प्रकरणांवर कार्यवाही सुरू आहे. त्यांची चौकशी गुरूवारी परीक्षा प्रमाद समितीच्या बैठकीत होईल.

कॉपी बहाद्दरांना झालेली शिक्षा

शिक्षेचा प्रकार विद्यार्थी संख्या

  • कॉपी करताना सापडलेल्या विषयाची संपादणूक (मिळालेले गुण) रद्द ४३५

  • संबंधित विषयाची संपादणूक रद्द आणि ५०० रूपये दंड ११३

  • विषयाची संपादणूक रद्द आणि १००० रूपये दंड ०१

  • संबंधित परीक्षेची संपादणूक रद्द ४७

  • परीक्षेची संपादणूक रद्द आणि ५०० रूपये दंड ०१

  • परीक्षेची संपादणूक रद्दसह पुढील एका परीक्षेस बसण्यास प्रतिबंध १६

  • परीक्षेची संपादणूक रद्द आणि पुढील दोन परीक्षेस बसण्यास प्रतिबंध १०

  • परीक्षेची संपादणूक रद्दसह पुढील तीन परीक्षेस बसण्यास प्रतिबंध २०

  • निकाल राखीव ठेवणे ०५

...

भरारी पथकाने कॉपी करताना पकडलेले विद्यार्थी - ५९४

बैठ्या पथकांना सापडलेले विद्यार्थी - १८५

Shivaji University
Loksabha Election : लोकसभा जवळ येताच पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसकडून मोठा बदल; 'या' नेत्यांना दिली महत्वाची जबाबदारी

‘कॉपी प्रकरणांच्या वाढत्या प्रमाणाला आवर घालण्यासाठी हिवाळी सत्रात प्रायोगिक तत्वावर बैठे पथक १८ केंद्रांवर तैनात करण्यात आली. त्या आणि भरारी पथकाच्या कारवाईने यावर्षी कॉपी करताना सापडणाऱ्यांचे आणि त्यांच्यावरील कारवाईचे प्रमाण वाढले. त्याने कॉपी करणाऱ्यांना निश्‍चितपणे वचक बसण्यास मदत झाली आहे. विद्यार्थ्यांच्या पातळीवर निकालात ३० टक्क्यांची घट झाली आहे. या दोन्ही पथकांची यापुढील परीक्षेत संख्या वाढविण्याचा विचार आहे.

-डॉ. अजितसिंह जाधव, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

Shivaji University
Kolhapur : ..तर संपूर्ण मंडप खाली येवू शकतो, त्यामुळं हा धोका कोणालाही पत्करु देणार नाही; काय म्हणाले जिल्हाधिकारी?

हिवाळी सत्रात प्रमाण वाढले

गेल्यावर्षीच्या परीक्षेत भरारी पथकांना ५५० विद्यार्थी कॉपी करताना सापडले होते. त्यापैकी ५०० जणांवर कारवाई करण्यात आली. हिवाळी सत्रातील परीक्षेत कारवाई झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६४८ वर पोहोचली आहे. त्यात आणखी वाढ होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()